Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे असेल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयाचे नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले आहे.
पक्ष व चिन्ह मिळाल्याबद्दल नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी (ता. ७) जल्लोष साजरा केला जाणार आहे. (There will be jubilation in NCP Bhavan today nashik news )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाजूला होत उपमुख्यमंत्री पवार यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी ‘एनडीए’त सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती.
दोन्ही बाजूंनी आपापली कायदेशीर बाजू मांडण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे असेल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयावर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष साजरा केला जाणार आहे. बुधवारी सकाळी अकराला राष्ट्रवादी भवन येथे जल्लोष केला जाणार आहे.
घड्याळ तेच, वेळ नवी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली, तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी पक्षाचे चिन्ह व झेंडा याची रचना केली तेच चिन्ह परत मिळाल्याचा आनंद आहे.
आम्हाला चिन्ह व नाव मिळाल्याने पक्ष नव्या पिढीच्या हाती आल्याचे समाधान आहे. त्यामुळे घड्याळ तेच असून वेळ नव्या पिढीची आहे, असे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.