ATM Theft case esakal
नाशिक

Nashik Crime News : एटीएम फोडून 19 लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार; पिंपळगाव बसवंतची घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील बँकांचे एटीएम मशीन चोरट्यांनी टार्गेट केले आहे. महिन्याभराच्या आत दुसऱ्यांदा भरवस्तीतील एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून १९ लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले आहे.

भरवस्तीत चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड लांबविल्याने पिंपळगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. (Thieves broke ATM and stole cash of 19 lakhs nashik crime news)

पिंपळगाव शहरातील जुना महामार्गावरील बसवंत मार्केटमधील व्यापारी संकुलातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन आहे. चोरट्यांनी बुधवारी (ता. २७) रात्री दोनच्या सुमारास एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने तोडले. त्यातील १९ लाख, सहा हजार रुपये घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली. विशेष म्हणजे एटीएम फोडण्यापूर्वी पिंपळगाव पोलिस गस्त घालून गेले होते.

मोठ्या चलाखीने चोरट्यांनी एटीएम फोडून डाव साधला. पोलिस पुन्हा गस्तीसाठी आले असता, एटीएम मशीन फोडल्याचे लक्षात आले. ठसे तज्ज्ञ व श्‍वान पथकांच्या सहाय्याने पिंपळगाव पोलिस चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपअधीक्षक सुनील भामरे, निरीक्षक अशोक पवार यांनी भेट दिली.

२४ तासांत दुसऱ्यांदा प्रयत्न...

बसवंत मार्केटमधील हेच एटीएम चोरट्यांनी मंगळवारी पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांचा डाव फसला.

चोरट्यांनी सलग दुसऱ्या दिवशी २४ तासांच्या आत पुन्हा तेच एटीएम फोडत रोकड लांबविली. सोमवारी चोरटे एटीएम मशीनजवळ पोचले असताना, मुख्य शाखेचा सायरन वाजला. त्याची सूचना सुरक्षारक्षकाने पिंपळगाव पोलिसांना दिल्याने चोरट्यांचे मनसुबे उधळले.

मात्र, बुधवारी सायरन वाजूनही सुरक्षारक्षकाने पोलिसांना सूचना न दिल्याने चोरटे रोकड घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, मगील महिन्यात चिंचखेड चौफुलीवर एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून २८ लाख लांबविले होते. त्यातील एका संशयिताला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या.

तो तपास अपूर्ण असतानाच, चोरट्यांनी पुन्हा एक एटीएम फोडून रोकड घेऊन पोबारा केला. मागील महिन्यातील घटना घडूनही बँकांकडून एटीएम मशीनला सुरक्षारक्षकही नेमण्यात आलेला नाही. बँकांच्या बेफिकीरीमुळे चोरट्यांचे फावते आहे. मागील महिन्यात एचडीएफसी व आता एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याच्या घटनांमध्ये साधर्म्य असून, पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT