thief esakal
नाशिक

Nashik Crime News : सिन्नरमध्ये दुचाकीस्वाराने पोत ओरबाडली

नातवाला खेळविण्यासाठी घराबाहेर उभे असताना शेजारील महिलेशी गप्पा मारणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून पोबारा केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नातवाला खेळविण्यासाठी घराबाहेर उभे असताना शेजारील महिलेशी गप्पा मारणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून पोबारा केला.

याबाबत रघुनाथ एरंडे (रा. वारकरी भवनजवळ, विजयनगर, सिन्नर) यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समजते. (Thieves on two wheeler scratched gold necklace around old woman neck nashik crime news)

सुरेखा एरंडे या शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरासमोरील अंगणात चिमुकल्याला खेळवत शेजारील महिलांशी बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील अडीच ते तीन तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून शिर्डी रोडकडे पोबारा केला. एरंडे यांनी आरडाओरड केली असता, परिसरातील नागरिकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरट्यांचा मागमूस लागला नाही.

चोरट्यांचा शहरात धुमाकूळ

सिन्नर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ वाढलेला असून, नागरिकांनी त्यांचा धसका घेतला आहे. अतिशय उच्चभ्रू वस्तीमध्ये व सतत वर्दळ असलेल्या वारकरी भवन येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एका महिलेची तीन तोळ्याची पोत चोरट्यांनी चोरून नेल्याने सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे.

लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सायंकाळी वारकरी भवन येथे महिला, पुरुष दर्शनासाठी, तसेच शतपावलीसाठी येतात. मात्र चोरीच्या भीतीपोटी अनेकांनी रस्त्यावर येण्याचे टाळले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT