Child actors performing We-Char children's play. esakal
नाशिक

Rajya Balnatya Spardha : 20 वी राज्य बालनाट्य स्पर्धेची तिसरी घंटा वाजली; 11 नाटके होणार सादर

सांस्कृतिक कार्य संचालनाच्यावतीने आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची तिसरी घंटा शनिवारी (ता. ६) उत्साहात वाजली.

सकाळ वृत्तसेवा

Rajya Balnatya Spardha : सांस्कृतिक कार्य संचालनाच्यावतीने आयोजित २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची तिसरी घंटा शनिवारी (ता. ६) उत्साहात वाजली. लेखक व दिग्दर्शक विवेक गरुड यांच्या हस्ते परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सकाळी साडेदहाला उद्घाटन झाले.

यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे परीक्षक अनघा वैद्य, विश्वनाथ निळे, प्रवीण आहिरे, समन्वयक राजेश जाधव, समन्वयिका मीना वाघ, श्‍याम लोंढे, रवी साळवे, चंद्रकांत जाडकर, सार्थक महाजन यांची उपस्थिती होती.(third bell has rung for 20th State Children Drama Competition nashik news)

नाशिकमधील वेगवेगळ्या संस्थांनी बालकलाकारांना सोबत घेऊन वेगवेगळ्या कलाकृती तयार करून सादर केल्या पाहिजे. त्यामुळे भविष्यात नवीन कलाकार तयार होतील असे मत विवेक गरुड यांनी व्यक्त केले. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक समन्वयक राजेश जाधव यांनी तर आभार श्रीपाद कोतवाल यांनी मानले.

८ जानेवारी पर्यंत सकाळी दुपारी २ पर्यंत रसिकांना बालनाट्यांचा आस्वाद घेता येणार आहे. तरी नाशिककर नाट्यरसिकांनी या बालनाट्य उपस्थित राहून बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन समन्वयक राजेश जाधव यांनी केले आहे.

आनंदी पालकत्वाची संदेश देणारे बालनाट्य ‘वुई-चार’

यानंतर इस्पॅलिअर हेरिटेज शाळेच्यावतीने 'वुई-चार' हे बालनाट्य सादर झाले. गुणांच्या मागे धावून अपेक्षांचे ओझे लादणारे पालक अनेकदा मुलांच्या इच्छा, आकांक्षा आणि आवड यांचा विचार करत नाही. अशावेळी अनेकदा मुलांच्या पदरी निराशा पडते. त्यातून ते आत्मविश्वास गमावतात, नैराश्य येते.

अपयश आणि आपल्या आजूबाजूचे 'ते' चार लोक काय म्हणतील, याचा सातत्याने विचार करत मुलांचे विश्व खराब करतात. अशावेळी मुलांना स्वतःची ओळख करून देणारे व आनंदी पालकत्व कसे असावे, याची सांगड घालणारे वुई-चार हे नाटक आजच्या शिक्षण व्यवस्थेतील चुकीच्या प्रथांवर परखड भाष्य करते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे नाटक प्रत्येक पालकाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. आनंदी पालकत्वाच्या दिशेने नवा विचार करायलाही प्रोत्साहित करते. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांची संकल्पना असलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन सुजित जोशी यांनी केले आहे.

श्रिया जांबोटकर, आश्विन देशमुख, अंशुल वरखडे, समर जोशी, काव्या शास्त्री, कल्पित काबरा, अंगत निकम, मितांशू आव्हाड, आयुष गोऱ्हे, आद्या बागमार, स्वर्णिम कुलकर्णी, विराट बोरसे, मृण्मयी अत्रे, दिशांत गवळी, अंशुमन आव्हाड यांनी भूमिका साकारल्या.

खऱ्या हिरोचा परिचय देणारे फॅन

उद्घाटनानंतर स्पर्धेत ३ बालनाट्य सादर झाली. सर्वप्रथम इस्पॅलिअर एक्सप्रिमेंटल शाळेच्या फॅन या नाटकाचे सादरीकरण झाले. आजच्या पिढीने नक्की कुणाला खरे हिरो मानावे अन् त्यांच्याप्रमाणे कार्य करावे असा समर्पक संदेश या बालनाट्यातून कलावंतांनी दिला. सुजित जोशी लिखित या बालनाट्याचे दिग्दर्शन मिलिंद फडके यांनी केले.

सौरभ , ओमकार खैरनार, वेदांत भदान, वेदा देशमुख, मंजिरी कुलकर्णी, खुशी धारणकर, यश्मित देशपांडे, ओम शेवाळे, सस्ति बेलन, ग्रीष्मा कोल्हे, केयुर बाग, सम्राट शुक्ला, मालिनी महाजन, शताक्षी वाघ, निरवी ठाकरे, व्योम दिक्षीत, कौस्तुभ देशपांडे, रागा निकम यांनी भूमिका साकारल्या.

शिक्षण क्षेत्राची परिस्थिती मांडणारे बालनाट्य

आत्मा मालिक या संस्थेतर्फे गुरू साक्षात परब्रह्म हे बालनाट्य सादर झाले. शिक्षक होण्यासाठी करावी लागणारी धडपड अन् सध्याच्या काळात त्यांच्यावर ओढावलेली परिस्थिती तसेच शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीवर या बालनाट्यात भाष्य करण्यात आले आहे. आनंद म्हसवेकर लिखित या नाटकाचे शरद ढोणे यांनी दिग्दर्शन केले.

शिवराज देवरे, तेजस वाघ, विराज बोरसे, प्राची वाघ, दीपक जंजाळ, ओमकार शिंगाडे, तृप्ती तिडके, पायल आहेर, शर्वरी वाळूंज, रिया पाटील, पलक बधान, पार्थ बच्छाव, प्रतीक जाधव, दिशा गावित, हर्षिता पाटील, साईराज तिडके, आर्यन लोणारी, आराध्य नार्वेकर, ईश्वर जाधव, तेजस पाटील यांनी भूमिका साकारल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT