MVP election Latest Marathi News esakal
नाशिक

Nashik : यंदा ‘MVP’ सभासद देणार 21 मते

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्‍या निवडणुकीत संचालक मंडळात उपाध्यक्ष आणि दोन महिला संचालकांची भर पडणार आहे.

त्‍यामुळे सभासद मतदारांना यंदा २१ मते देता येणार आहेत. तीन सेवक संचालक असून, एकूण २४ उमेदवारांसाठी असलेल्‍या मतपत्रिकेमध्ये दोघांची भर पडणार असून, यंदाच्या निवडणुकीत २२ मतपत्रिका असतील. (This year MVP members will give 21 votes Nashik Latest marathi news)

२०२२-२०२७ या कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे. येत्‍या २८ ऑगस्‍टला मतदान, तर २९ ऑगस्‍टला मतमोजणी होईल. प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाला शुक्रवार (ता. ५)पासून सुरवात होणार आहे. संस्‍थेच्‍या मध्यवर्ती कार्यालयात लवाद, निवड मंडळाच्‍या कामकाजाला सुरवात झाली.

यंदाच्‍या निवडणुकीत सभासदांमधून दोन महिला संचालक, तसेच उपाध्यक्षांच्‍या रूपाने कार्यकारिणीत तीन उमेदवारांची भर पडणार आहे. यापूर्वीच्‍या कार्यकारिणीनुसार अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सभापती, उपसभापती आणि तालुका प्रतिनिधींसाठी १३, असे १८ उमेदवारांना मतदान करावे लागत होते.

त्‍यात आता सभासदांना उपाध्यक्ष आणि दोन महिला संचालक, अशा तीन अतिरिक्‍त उमेदवारांसाठी मतदान करावे लागणार आहे. सेवक सभासदांना त्‍यांचे प्रतिनिधित्‍व करण्यासाठी पूर्वीप्रमाणे एक महिला व दोन पुरुष, अशी एकूण तीन मते द्यावी लागतील.

उपाध्यक्षपदासाठी एक आणि महिला संचालकासाठी एक, अशा एकूण दोन मतपत्रिका यंदा वाढणार आहेत. कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांकरिता सहा, तालुका संचालकांसाठी १३, महिला संचालकाची एक आणि सेवक संचालकांच्‍या दोन अशा २२ मतपत्रिका असणार आहेत.

संस्‍थेचे तालुकानिहाय मतदार असे

-निफाड : दोन हजार ९०३

-सटाणा : एक हजार ४१६

-नाशिक शहर : ८७६

-दिंडोरी-पेठ : ८३८

-मालेगाव : ७८३

-नाशिक ग्रामीण : ७०७

-चांदवड : ६८४

-देवळा : ५६७

-सिन्नर : ४४३

-कळवण-सुरगाणा : ३४८

-नांदगाव : २९२

-येवला : २०२

-इगतपुरी : १३८

-एकूण : दहा हजार १९७

----

सेवक सभासद

-उच्च माध्यमिक व महाविद्यालय : १२७

-प्राथमिक व माध्यमिक : ३३६

-एकूण : ४६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT