this year nashik record second highest level of pollution was recorded in state news 
नाशिक

Nashik Diwali Pollution: नाशिककरांनी यंदाच्या दिवाळीत केला कहर; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर प्रदूषणाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Diwali Pollution : मुंबईसह राज्यातील ढासळत चाललेली हवेची परिस्थिती व ती सुधारणासाठी न्यायालयाने दिलेले निर्देश याकडे यंदाच्या दिवाळीत नाशिककरांनी संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याने कधी नव्हे, एवढे फटाके लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडल्याने राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषण झाल्याची नोंद झाली आहे.

नाशिक हे पर्यटकांचे विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी आल्हाददायक वातावरण व शुद्ध हवेमुळे देश-विदेशातील पर्यटक नाशिकला हजेरी लावण्यासाठी उत्सुक असतात. फेब्रुवारीत तर नाशिकच्या गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी जत्राच असते. (this year nashik record second highest level of pollution was recorded in state news)

असे असले, तरी या वर्षी मात्र नाशिककरांनीच आपल्या शहराचे वातावरण खराब करण्याचा जणू चंगच बांधला आहे, असे प्रदूषण विभागातील दिवाळी काळातील आकडेवारीवरून समोर आले आहे.

खास करून शहरातील अतिश्रीमंत लोकवस्ती असलेल्या गंगापूर रोड, नाशिक रोड, पाथर्डी फाटा परिसरातील नागरिकांनी सर्वांत जास्त फटाके फोडल्याने घातक केमिकल व सर्वांत जास्त प्रदूषण होणारे घटक धुरामुळे हवेत मिसळले. त्यामुळे कधी नव्हे, नाशिकची हवेची पातळी ही ४५ वरून थेट २५६ वर एअर क्वालिटी इंडेक्सवर पोहोचली आहे.

"नाशिकची दैनंदिन हवेची गुणवत्ता अतिशय उत्तम श्रेणीत गणली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा इतिहास आहे, यासाठी नाशिककरांचे विशेष प्रयत्न आहेत; पण या वर्षी मात्र नाशिककरांनी वेगळीच भूमिका घेतल्याने शहरातील हवेचे वातावरण बिघडले. नाशिकचे वातावरण टिकविण्यासाठी फटाक्यांबाबत येणाऱ्या काळात वेगळा विचार करण्याची व शक्यतो ग्रीन दिवाळी करण्याची गरज आहे." - राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

हवेची गुणवत्ता आकडेवारी २०२३

तारीख------गंगापूर----पंचवटी----अंबड-----पांडवनगरी

८/११/२३---१३९ १०३ १२६ १०५

९/११/२३ -- १६१ ११४ १४७ १२३

१०/११/२३ - १२० ९८ १३८ १०२

११/११/२३ - १३८ ११२ १६५ १००

१२/११/२३ - २२२ ११० १९७ १९०

१३/११/२३ - २५६ १३० २६१ २४६

१४/११/२३ - १४८ ९८ १४१ १७८

१५/११/२३ - १६१ १२४ १४१ १८९

हवेची गुणवत्ता क्यूआर श्रेणी

० ते ५० - उत्तम

५१ ते १०० - चांगली

१०१ ते २०० - मध्यम

२०१ ते ३०० - खराब

३०१ ते ४०० - अत्यंत खराब

सन २०१९ मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११०

सन २०२० मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३०

सन २०२१ मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक १४०

सन २०२२ मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक १४६

सन २०२३ मध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक २५६

सूक्ष्म धूलिकण निर्देशांक ११७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT