Followers participating in Japonusthana during the ongoing religious ceremony in Tapovan and Hanuman, the devotee of Rama. esakal
नाशिक

Nashik News: तपोवनात अवतरली अयोध्यानगरी! संत जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: कठोर तपस्वी, निष्काम कर्मयोगी जगद्‍गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित श्रीराम कथेप्रसंगी श्रीराम- सीता विवाह सोहळा फटाक्यांच्या आतषबाजीत, फुलांचा वर्षाव करीत हजारो भाविकांनी नाचून- गाऊन जल्लोषात केला. यानिमित्त सोहळ्यात प्रत्यक्ष अयोध्यानगरी अवतरल्याची अनुभूती मिळाली. (Thousands of devotees attended commemoration ceremony of Sant Janardhan Swami Maharaj nashik news)

जय बाबाजी भक्त परिवारातर्फे जगद्‍गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा उत्तराधिकारी अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर समर्थ सद्‍गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत सुरू आहे. सोहळ्यात प्रसिद्ध रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीत श्रीराम कथा सुरू आहे.

या कथेप्रसंगी श्रीराम-सीता जन्मोत्सव सोहळा फटाक्यांच्या आतषबाजीत, अक्षता व फुलांची मुक्त उधळण करीत हजारो भाविकांनी नाचत-गात श्रीराम-जानकी विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात केला. कथेप्रसंगी स्वामी शांतिगिरी महाराज यांचेही आगमन झाल्याने भाविकांचा उत्साह अधिकच वाढला. रामायणाचार्य समाधान महाराज यांनी श्रीराम कथेतील विविध प्रसंग आपल्या खास शैलीत सादर केले. प्रसंगानुसार सुमधुर भक्तिगीते सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

जय बाबाजी भक्त परिवारातर्फे तपोवनात सुरू असलेल्या धर्मसोहळ्यात मंगळवारी श्रीराम कथेप्रसंगी श्रीराम-सीता विवाह सोहळ्याचा प्रसंग.

प्रभूश्रीरामचंद्रांनी शिळा असलेल्या अहिल्याचा आपल्या चरण स्पर्शाने उद्धार केला. असे विविध प्रसंग सांगून श्रीरामकथेतील एक-एक प्रसंग सांगताना अनंत विभूषित शांतिगिरी महाराजांच्या गुरुभक्तीच्या शक्तीमुळेच इतक्या विराट स्वरूपात आपल्याला कथेचा लाभ झाला असल्याचे समाधान महाराज यांनी सांगितले. आपल्या सद्‍गुरू चरणांवर निष्ठा व विश्वास ठेवल्यास जिथे जाल तिथे पूज्य व्हाल, असे सांगून बाबाजींनी सांगितलेल्या चतुःसूत्रीचे पालन करा.

परअन्न, परधन, परदार, परनिंदा यांचा त्याग करा, या सद्‍गुगरूंच्या आदेशाचे पालन करा, यातूनच तुमचा उद्धार होईल. शांतिगिरी महाराज यांचे कार्य देव- देश- धर्मासाठी आहे, यांसह विविध विषयांवर समाधान महाराज शर्मा यांनी मार्गदर्शन केले. या धर्म सोहळ्यात जपानुष्ठान, महायज्ञ, अखंड नंदादीप, भागवत पारायण, नामसंकीर्तन, हस्तलिखित नामजप आदी विविध धार्मिक उपक्रम सुरू असून, कार्यक्रमस्थळी रोज हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT