Pandit Pradeepji Mishra. 
नाशिक

Shiva Mahapuran Katha: शिवमहापुराण कथेसाठी हजारो भाविक जाणार; रिक्षांसह वाहनांचे वैयक्तिकरित्या आरक्षण

सकाळ वृत्तसेवा

Shiva Mahapuran Katha : सिहोर येथील पंडीत प्रदीप मिश्रा यांची श्री शिवमहापुराण कथा धुळे येथे १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या सहकार्यातून धुळे येथे होणाऱ्या श्री शिवमहापुराण कथेसाठी मालेगावातून हजारो श्रद्धाळू जाणार आहेत.

येथील श्री शिवाय नमस्तुभ्यं ग्रुप सेवा समितीतर्फे भोजन कक्षात सेवारूपी मदत दिली जाणार आहे. कथा श्रवणासाठी भाविकांचे नियोजन सुरु आहे. शहरासह ग्रामीण भागातून भाविकांनी पाच दिवसासाठी ने-आण करण्यासाठी वाहने आरक्षित केली आहेत. काही महिला भाविक पाच दिवस धुळे मुक्कामी जाणार आहेत.

मालेगाव येथे गेल्या वर्षी पंडित प्रदीप मिश्रा यांची खानदेशातील पहिली सात दिवसीय श्री शिवमहापुराण कथा झाली. (Thousands of devotees will go for Shiva Mahapuran katha from malegaon nashik news)

या कथेला भाविकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. पंडितजींच्या कथेनंतर शिवमंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. शाळकरी मुले, महिलांचा यात मोठा समावेश आहे.

‘एक लोटा जल, सारी समस्याओंका हल’ या पंडितजींच्या उपदेशाची गावागावात अंमलबजावणी केली जात आहे. शिव मंदिरे भल्या पहाटेपासून गजबजून जात आहेत. तालुका व परिसरात वर्षभरात अनेक नवीन शिवमंदिरे आकाराला आली. पालकमंत्री भुसे यांच्या सहकार्याने पंडितजींची पाच दिवसीय शिवमहापुराण कथा धुळे व नाशिक येथे होत आहे. १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत धुळे येथे तर २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत नाशिकला कथा होईल.

मालेगावहून धुळे येथे जाणे खूपच सोयीचे आहे. हजारो कुटुंबीयांनी कथा श्रवणासाठी जाण्याचे नियोजन केले आहे. ग्रामीण भागातून महिला भाविकांनी पाच दिवसासाठी ऑटो रिक्षा व इतर वाहने आरक्षित केली आहेत. पंडितजींची धुळे व मालेगाव येथील कथेनंतर जळगावमध्ये ५ ते १२ डिसेंबर या काळात सात दिवसीय शिवमहापुराण कथा होणार आहे. आगामी काळात खानदेशमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यंचा जयघोष सर्वत्र ऐकू येणार आहे.

"पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मालेगाव येथील कथेनंतर लहान मुले, माता-भगिनी, तरुण, ज्येष्ठ अशा सर्व स्तरातील नागरिक मंदिरात जात आहेत ही आनंदाची बाब आहे. धार्मिक कार्यामुळे अनेक तरुण व्यसनापासून दूर जात आहेत. पंडितजींच्या धुळे व मालेगाव येथील कथेला लाखो श्रद्धाळू उपस्थित राहतील त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. देवाधिदेव महादेवांच्या कथेचा भाविकांनी लाभ घेऊन जीवन कृतज्ञ करावे."- दादा भुसे, पालकमंत्री

"धुळे व नाशिक येथील कथेदरम्यान भोजन कक्षात मालेगाव येथील माता-भगिनी सेवा देणार आहेत. जळगाव येथील कथेसाठी देखील सेवेचे नियोजन करण्यात आले आहे. धुळे येथील सेवेसाठी मालेगाव भोजन कक्षाची जबाबदारी महेश पाटील यांच्याकडे दिली आहे. पंडितजींच्या तीनही कथांना मालेगाव येथील सेवेकरी सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहेत." - देविदास पाटील, श्री शिवाय नमस्तुभ्यं ग्रुप मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

SCROLL FOR NEXT