Arrested News esakal
नाशिक

Nashik Crime News : महेशनगरातील घरफोडी प्रकरणी तिघांना अटक; सव्वापाच लाखाचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावरील महेशनगर भागातील सुमारे साडेअठरा लाखाची घरफोडी उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

घरफोडीनंतर अवघ्या तीन दिवसात चौकशी आणि वेगाने तपासचक्र फिरवत यातील तिघा संशयितांना शहर पोलिसांच्या पथकाने भुसावळ व धरणगाव तालुक्यातून अटक केली. अटक केलेल्यांकडून पोलिसांनी सुमारे पाच लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

तिघा संशयितांना २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. (Three arrested in Mahesh Nagar burglary case one half lakhs confiscated Nashik Crime News)

शहरातील मध्यवर्ती शिवाजी पुतळ्याजवळ सचिन सुभाषचंद छाजेड (वय ४३, रा. महेश नगर) यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

छाजेड यांच्या बेडरुममधील लाकडी कपाटाचे लॉक व तिजोरीचे लॉक तोडून कपाट व तिजोरीतील १४ लाख ३९ हजार ७०० रुपये रोख, तीन लाख रुपयांच्या लक्ष्मी पुजनाच्या कोऱ्या नोटा, एक लाख ९५ हजार रुपये किमतीच्या बांगड्या, पाटल्या, अंगठी, गठण, नथ, कानातले जोड असे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे १८ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

मध्यवर्ती ठिकाणी घरफोडी झाल्याने खळबळ उडाली होती. येथे नजीकच तीन बँकदेखील आहेत. त्यामुळे या घरफोडीचा तपास पोलिसांसाठी आव्हान होता. अनेक महिन्यांनतर मोठी घरफोडी झाली होती.

अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रिती सावजी यांनी या प्रकरणी उपनिरीक्षक सुजीत पाटील व सहकाऱ्यांचे विशेष पथकावर जबाबदारी सोपवली. या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. त्यात या तिघा संशयितांची ओळख पटली.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

शहर पोलिसांच्या पथकाने शहरात या संशयितांचा शोध घेतला असता ते खानदेशात फरार झाल्याचे समजले. यानंतर उपनिरीक्षक पाटील, हवालदार सुनील दांडगे, पोलिस शिपाई तुषार अहिरे, योगेश ठाकूर, पंकज डोंगरे आदींच्या पथकाने सहीम सलीम अहमद (२६), समीर इब्राहिम शाह (२७, दोघे रा. मर्चंट नगर, मालेगाव) व समशेर पीर खान (२५, रा. इंदिरानगर) यांना अटक केली.

संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली देतानाच यातील सुमारे पाच लाख ३८ हजाराचा ऐवज हस्तगत केला. अन्य ऐवज व रक्कम

जप्त करण्याची कार्यवाही व चौकशी सुरु आहे. तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT