Experience the thrill of the battlefield at a combat army aviation base esaka
नाशिक

Nashik News : Sky Soldierच्या प्रात्यक्षिकांचा थरार!

विनोद बेदरकर

नाशिक : कॉम्बॅट आर्मी एव्हिएशनच्या गांधीनगर येथील तळावर आज एव्हिएटर्स कोर्स, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स आणि बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टिम कोर्सच्या अशा विविध पाठ्यक्रमात नैपुण्य मिळविणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना विंग प्रदान करण्यात आले. विविध प्रशिक्षणांच्या एकत्रित पासिंग आउट संचलनात चार महिला अधिकाऱ्यांसह नायजेरियन लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील कॉम्बॅट मिलिटरी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट) ही आर्मी ट्रेनिंग कमांडच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली भारतीय लष्कराची ३८ वर्षे जुनी प्रमुख उड्डाण प्रशिक्षण संस्था आहे. ‘कॅट’चे महासंचालक आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १) झालेल्या विंग प्रदान कार्यक्रमाला सहसंचालक कमांडिग ऑफिसर ब्रिगेडियर संजय बाढेरा, ‘कॅट’चे सह संचालक कर्नल डी. के. चौधरी आदींच्या उपस्थितीत विंग प्रदान करण्यात आले. (thrill of Sky Soldiers demonstration at gandhinagar CAT wing distribution nashik Latest Marathi News)

५८ एव्हिएटर्सचा गौरव

प्रशिक्षणादरम्यान ५७ अधिकाऱ्यांना कॉम्बॅट एव्हिएटर्स/आरपीएएस क्रू म्हणून विमान उड्डाणाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. यात नायजेरियन अधिकाऱ्यासह ३२ अधिकाऱ्यांना (कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स) यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी प्रतिष्ठित एव्हिएशन विंग्सने सन्मानित करण्यात आले. याशिवाय एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स (एएचआयसी) सात अधिकाऱ्यांना एव्हिएशन हेलिकॉप्टर प्रशिक्षक म्हणून, तर क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर (क्यूएफआय) बॅच देण्यात आले. बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टिम प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल १८ अधिकाऱ्यांना (आरपीएएस पायलट) म्हणून गौरविण्यात आले.

पाठ्यक्रमात ३८ मध्ये ट्रॉफी विजेत्यांत कॅप्टन नमन बन्सल यांना प्रथम आल्याबद्दल रौप्य चित्ता ट्रॉफी, मेजर अभिमन्यू गणाचारी यांना (ओव्हरऑल बेस्ट ऑफ आर्मी हेलिकॉप्टर) इन्स्ट्रक्टर कोर्स (एएचआयसी) तर पाठ्यक्रम ३७ मध्ये मेजर प्रदीप अग्रवाल आणि मेजर नवनीत जोशी, लेफ्टनंट कर्नल पुनीत नगर यांना बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टिम (आरपीएएस) (इंटर्न पायलट आणि ऑब्झर्व्हर) म्हणून विंग प्रदान करण्यात आले.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशनच्या (कॅट) तळावर प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या महिला एव्हिव्हीएटर्स.

चार महिला अधिकारी

मेजर एन. जोशी हे आणि लेफ्टनंट कर्नल पुनीत नागर हे ऑब्झर्व्हर्स कोर्समध्ये अव्वल राहिले. मेजर अभिमन्यू गणाचारी (एएचआयसी) अभ्यासक्रमात अव्वल ठरले, कॅप्टन नमन बांदल यांनी चांदीचा चित्ता करंडक जिंकला. महिला अधिकारी कॅप्टन सुजाता आर्य, कॅप्टन मल्लिका नेगी, कॅप्टन गौरी महाडिक आणि कॅप्टन अनुमेहा अशा चार महिला अधिकाऱ्यांना विंग प्रदान झाले.

स्काय सोल्जरचा थरार

विंग प्रदान कार्यक्रमानंतर चिता, चेतक, ध्रुव या पारंपरिक लष्करी हेलिकॉप्टरसह शत्रूच्या हद्दीत टेहाळणी करून माहिती संकलित करणाऱ्या विनापायलट स्काय सोल्‍जरचा थरार हे यंदाचे वैशिष्ट्य होते. विनापायलट जमिनीला समांतर पद्धतीने रेकी करीत क्षणात गायब होणाऱ्या स्काय सोल्जरच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. एकत्रितपणे युद्धभूमीवर साहित्य पुरविताना जखमींना हलविण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

वीरपत्नी कॅप्टन गौरी यांचे कर्तृत्व

‘कॅट’च्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात विंग मिळविणाऱ्यांत चार महिला अधिकारी आहेत. एकाचवेळी चार महिला अधिकाऱ्यांचा प्रवेश हेही या तुकडीचे वैशिष्ट्य राहिले. अनुमेघा त्यागी, ओजस अग्रवाल, गौरी महाडिक, कॅप्टन सुजाता अशा चार महिलांनी हा सन्मान मिळविला. त्यात, कॅप्टन सुजाता यांचे पती विवेक लष्करात अधिकारी आहे. कॅप्टन गौरी महाडिक वीरपत्नी आहेत. त्यांचे पती २०१७ मध्ये अरुणाचल प्रदेशात सीमेवर सुरक्षेदरम्यान शहीद झाले होते.

२०१५ मध्ये विवाहानंतर दोन वर्षांत आलेल्या परिस्थितीला तोंड देताना कॅप्टन गौरी महाडिक यांनी लष्करातील वीरपत्नीसाठीचे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करीत, स्वतःही देशसेवेसाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुरुवारी त्यांनी आर्मी एव्हिएशनचे एव्हिएटर्स म्हणून पदक मिळविले. नायजेरियन अधिकारी मेजर ऑफोडिल हेही पास झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT