Through new cultural policy doors of classical music in music sector should be reopened nashik news esakal
नाशिक

Nashik Music Industry : अभिजात संगीताचे दरवाजे पुन्हा उघडावे; संगीतक्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Music Industry : संगीतक्षेत्रातील कलावंतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विविध अडचणींविषयी सांस्कृतिक धोरणात शिफारस करण्यात आलेली आहे.

नव्या सांस्कृतिक धोरणाद्वारे संगीतक्षेत्रातील अभिजात शास्त्रीय संगीताचे दरवाजे पुन्हा उघडावे, अशा अपेक्षा नाशिकमधील संगीतक्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.

सांस्कृतिक धोरणामध्ये अभ्यास, संशोधन करणाऱ्या संगीतकारांना सवलत मिळावी. पुणे, मुंबईचेच कलाकार नाशिकमध्ये किंवा राज्यातील इतर शहरांमध्ये सरकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. (Through new cultural policy doors of classical music in music sector should be reopened nashik news)

त्यामुळे स्थानिक कलावंतांना याचा फायदा होत नाही. आजची तरुणाई धाडसी त्यांना प्रोत्साहन मिळावे. एका काव्यसंग्रहाला वीस पुरस्कार मिळतात परंतु, एखादी नवीन कलाकृतीला, नवीन रचनेला प्रोत्साहन मिळताना दिसत नाही.

कलावंतांना मिळावा विमा

पाश्चात्त्य संगीतामुळे शास्त्रीय संगीत शिक्षण कमी होत आहे. तसेच प्रशिक्षणाचा अभाव आहे. सांस्कृतिक धोरणात संगीतक्षेत्रातील कलावंतांचा विमा असावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. आज माथाडी कामगारांना विमा संरक्षण मिळते मात्र कलावंतांना मिळत नाही. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठीही धोरणात तरतूदी आवश्यक असल्याचे संगीतक्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

भारतीय संगीत सौंदर्याची खाण

संगीत कलेत आश्रित दृष्टिकोनातून पाहिले तर तिचा दर्जा मातीमोल करतो आहोत, श्रेष्ठ भारतीय संगीत म्हणजे सौंदर्याची खाण आहे. जगातील अनेक कलाकार भारतीय संगीताच्या आश्रयाखाली अभ्यास करतात व या खाणीतील संपत्ती शोधतात. नवीन पिढीमध्ये अभिजात कलामूल्ये रुजावीत असे श्री. चंद्रात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"संगीत विशारद ही पदवीच मुळात सोपी झाल्याने शास्त्रीय संगीतातील सौंदर्य हरपले आहे. दहा संगीत शिक्षकांमागे एक गुरू असावा तसेच, डॉक्टर, वकिलांना प्रतिष्ठा मिळते ती कलाकारांना मिळताना दिसत नाही, शास्त्रीय संगीताचा दर्जा, गुणवत्ता वाढावा समाज मनाचे प्रतिबिंब संस्कृतीत उमटावे." - सचिन चंद्रात्रे सदस्य, सांस्कृतिक धोरण संगीत उपसमिती

"जे बाजारात चालते तेच ते केल्याने बाजारू वृत्ती निर्माण होते. संशोधन, अभ्यासू वृत्ती कमी होते. हा प्रकार संगीतक्षेत्रात वाढला आहे. पूर्णवेळ संगीतक्षेत्रातून कुटुंब उदरनिर्वाह करणाऱ्या कलावंतांना संधी द्यावी. नवीन रचनांचा अभ्यास, नवीन सुर निर्माण करतात जे संगीतक्षेत्राला देणे लागतात त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे." - संजय गिते, संगीतकार

"कलावंतांना व्यसपीठ निर्माण करावे, संगीतक्षेत्रात काही काळ काम केल्यानंतर तो कलावंत दुर्लक्षित होतो. त्यासाठी कृती करण्याची गरज आहे. कलावंतांना विविध संस्थांमधील प्रवेश सुलभ होऊन चांगले प्रशिक्षण मिळावे. त्यातून कलावंत घडविण्यात ठोस भूमिका असावी." - मिलिंद गांधी, कवी- गीतकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT