Throwing stones at DJ of devotees going for Chaitrotsava in Malegaon esakal
नाशिक

मालेगाव : चैत्रोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांच्या डीजेवर दगडफेक

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर (Saptashrungi Gad) जाणाऱ्या शिरपूर परिसरातील भाविकांच्या डिजेवर फराहन हॉस्पीटल देवी मंदिराजवळ सोमवारी (ता.११) रात्री दगडफेक झाल्याने खळबळ उडाली. १५ ते २० तरुणांच्या टोळक्याच्या या कृत्यामुळे शहर वेठीस धरले गेले. या टोळक्याने दोघांचा मोबाईल फोडला. वादात दोघा भाविकांचे मोबाईल चोरीला गेले. हिंदुत्ववादी संघटनांनी याबद्दल संतप्त भावना व्यक्त करतानाच छावणी पोलिस ठाण्याला घेराव घालत कठोर कारवाईची मागणी केली. कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर पोलिस ठाण्यासमोर श्री. भुसे यांनी दोषींवर कठोर कारवाई करा. कोणाची गय करु नका. पोलिस बंदोबस्तात वाढ करा अशा सूचना दिल्या.

डीजेवर दगडफेकीच्या घटनेनंतर शहर व परिसरात अफवांचे पेव फुटले. सोशल मिडीयावरही रिकामी डोकी कार्यरत झाली. खान्देशातून गडावर येणाऱ्या भाविकांना शहराबाहेरून वळविण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली. या अफवांची दखल घेत अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी भाविकांना गडावर जाण्यासाठी कुठलाही अडथळा नाही. पारंपरिक मिरवणूक मार्गात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही. याउलट मार्गावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले. पत्रकात अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.

दगडफेकीच्या घटनेनंतर रात्री श्री. भुसे यांच्यासह उपमहापौर निलेश आहेर, भाजपचे (BJP) शहराध्यक्ष मदन गायकवाड, नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे, जितेंद्र देसले, युवा सेनेचे विनोद वाघ आदींसह बहुसंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी छावणी पोलिस ठाण्यासमोर घेराव आंदोलन केले. सकाळीही समाजकंटकांच्या दबावामुळे मिरवणूक मार्गात फेरबदल करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला. त्यावर श्री. खांडवी यांनी मिरवणूक मार्ग जैसे थे असल्याचे स्पष्ट केले. रात्री श्री. भुसे यांनी जमावाला आश्‍वासन देतानाच मिरवणूक मार्गावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना दिल्या. हल्लेखोरांवर कठोर कारवाई होईल असे आश्‍वासन दिल्यानंतर घेराव आंदोलन मागे घेण्यात आले. घटनेनंतर पोलिस यंत्रणाही सक्रिय झाली. सीसीटीव्ही फुटेज तपासत तसेच खबऱ्यांकडून माहिती मिळवून हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

दगडफेकीच्या घटनेचा निषेध

चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगीगडावर जाणाऱ्या भाविकांच्या डिजेवर दगडफेकीच्या घटनेचा शिवसेना (Shivsena), भाजप, मनसे (MNS), सार्वजनिक नागरी सुविधा समिती, विश्‍व हिंदू परिषद, छावा संघटना (Chhava Sanghatana) आदींसह विविध पक्ष-संघटनांनी निषेध केला आहे. आज रात्री शिरपूरचा मानाचा रथ येत असून या रथाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन सोशल मिडीयातून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT