Dhananjay Bele, president of NIMA, while giving guidance and officials of various organizations present at the meeting held on the issues of industrial organizations.  esakal
नाशिक

Nashik News : सर्व औद्योगिक प्रश्न सामुहिकरित्या सोडविणार; पदाधिकाऱ्यांची वज्रमूठ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्याच्या उद्योगविश्वाला भेडसावणाऱ्या विविध समस्या तसेच समान मुद्द्यांवर एकत्रित लढण्यासाठी सर्व औद्योगिक संघटना एकवटल्या असून यापुढे नोकरशहांचा व वेळप्रसंगी शासनातर्फे एकतर्फी लादल्या जाणाऱ्या निर्णय व करांसाठीचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा या संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींच्या निमा हाऊस (सातपूर) येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला. (To solve all industrial problems collectively Vajramuth of office bearers nashik news)

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या पुढाकाराने निमा हाऊसमध्ये ही बैठक झाली. आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, महाराष्ट्र चेंबरचे नाशिकचे सहअध्यक्ष संजय सोनवणे, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, सचिव राजेंद्र अहिरे होते. औद्योगिक संघटनांपुढे पूर्वलक्षी प्रभावाने गोळा केल्या जाणारा जीएसटी, एलबीटीच्या नोटिसा, महावितरणचे वाढीव डिपॉझिट, कामगार संघटनांचे असलेले प्रश्न, तसेच कायदा व सुव्यवस्था, पोलिस प्रशासनाचे सहकार्य, एमआयडीसीद्वारे लावण्यात येणारे विविध कर, अवाजवी घरपट्टी, पायाभूत सुविधा स्वच्छता, अतिक्रमण एमआयडीसी, महावितरण तसेच विविध यंत्रणातर्फे राबविले जाणारे एकतर्फी निर्णय आदी मुद्द्यांबाबत चर्चा होऊन विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मते मांडली. या सर्व समस्यांचा कणखर आणि संघटितपणे मुकाबला करण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी किमान सहमती कार्यक्रम आखावा असे मत मांडण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वेगळ्या संघटनांमुळे फायदा

जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटना आपापल्या स्तरावर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात.परंतु प्रत्येक संघटनेची मांडण्याची पद्धत वेगवेगळी असल्याने शासन किंवा अधिकारी याचा गैरफायदा घेतात व ते प्रश्न प्रलंबित ठेवतात. त्यामुळे सामूहिक प्रश्न एकाच व्यासपीठावरून किंवा सर्व असोसिएशननी ते एकत्रितरित्या मांडल्यास त्याचा चांगला प्रभाव पडेल, त्वरेने ते निकाली निघण्यास त्याची चांगली मदत होईल असे बेळे यांनी निदर्शनास आणले असता सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास एकमुखी सक्रिय पाठिंबा दर्शविला.

उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ज्या ठिकाणी शासन दरबारी किंवा अधिकाऱ्यांकडे दाद दिली जात नाही, तसेच जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक आणण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय घेणे व शासन दरबारी पाठपुरावा करणे यासाठी औद्योगिक संघटनांचा जिह्याच्या विकासासाठी दबाव गट निर्माण करण्याचा निर्णयही घेण्यात आला. जिल्ह्यात एमआयडीसीकडून बंद उद्योगांच्या केल्या जाणाऱ्या मोठ्या प्लॉटचे विभाजन होऊ नये, यासाठी तसेच दलालांचा सुळसुळाट थांबावा यासाठी सामूहिकपणे आवाज उठविण्याचेही या बैठकीत ठरले.

बैठकीस निमा, आयमा, निवेक, नाईस, स्टाइस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सीमा, लघुउद्योग भारती आदींसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. संदीप पगारे, सुनील मोरे, मनीष रावल, संजय सोनवणे, राजेंद्र वडनेरे, विरल ठक्कर, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे, मारोती कुलकर्णी, बबन वाजे, रतन पडवळ, मुकेश देशमुख, विजय अनिकिवी, सुनील जोंधळे, अरुण भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यालयात व पुढाकाराने घेण्याचे ही यावेळेस निश्चित करण्यात आले.

यांनी दिला एकमुखी पाठिंबा

नाशिक जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटना,समर्थ इंडस्ट्रियल इस्टेट (पिंपळगाव बसवंत), येवला, मालेगाव,कळवण,मनमाड, आणि चांदवड येथील को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट, सिद्धी विनायक इंडस्ट्रीज लिमिटेड( ओझर),मालेगाव इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, या बरोबरच गोंदे, वाडीवऱ्हे, पाडळी, इगतपुरी, सटाणा, निफाड आदी ठिकाणच्या उद्योजकांनीही सामूहिकरित्या निमाच्या बॅनरखाली काम करण्याच्या निर्णयास व सामूहिक लढ्याच्या निर्णयास पाठिंबा दिल्याचे निमाचे अध्यक्ष व बैठकीचे निमंत्रक धनंजय बेळे यांनी नमूद केले. सचिव राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT