Tobacco powder, native liquor became more expensive In lockdown 
नाशिक

अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ‘देशप्रेमीं’ची पंचाईत; तंबाखूची पुडी, देशी दारू महागली

अवैध मार्गाने तिप्पट किंमत मोजून आपली तलफ भागविण्याची वेळ या देशप्रेमींवर आली आहे.

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सरकारने कोरोना साखळी खंडित करण्यासाठी कठोर नियमावली लागू केल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थ, देशी-विदेशी मद्याची चोरटी विक्री जोरात सुरू झाली आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी सरकारनेच दारू विक्रीला परवानगी दिली होती. त्या वेळी आम्ही अर्थव्यवस्थेला उभारी देतोय, असे सांगणाऱ्या मद्यपींची छाती काही इंचाने फुगली होती. आता नव्या नियमावलीत सरकारने पहिल्या गाडीने मद्यविक्रीला चाप लावल्याने अर्थव्यवस्थेच्या या पाइकांची मात्र पंचायत झाली आहे. गावोगावीचे मद्याचे ठेले बंद असले तरी अवैध मार्गाने तिप्पट किंमत मोजून आपली तलफ भागविण्याची वेळ या देशप्रेमींवर आली आहे. सोबतीला दहा रुपयांना मिळणाऱ्या तंबाखूच्या पुडीसाठी आता २० रुपये मोजावे लागत आहेत.

तलफ भागवण्यासाठी वाट्टेल ते…

गेल्या लॉकडाउनमध्ये सरकारने तंबाखूजन्य पदार्थांसोबतच मद्य विक्रीवर निर्बंध घातले होते. त्या वेळीदेखील किरकोळ विक्रीच्या किमतीपेक्षा दुप्पट- तिप्पट दराने आपली तल्लफ भागविण्याची वेळ बहुसंख्येने अनेकांवर आली होती. त्या वेळी तंबाखूच्या पुडीचे दर ५० रुपयांच्या घरात पोचले होते. तर, देशी-विदेशीचा साठा उपलब्ध करून घेण्यासाठी मद्यपींना अपार कष्ट घ्यावे लागत होते. कारण, दुकाने बंद म्हटल्यावर साठेबाजी करून अवैध मद्यविक्रीला सर्वच ठिकाणी जोर आला होता. जसजसा लॉकडाउन लांबत गेला तसतशी मद्याच्या किमतीतही वाढ होत राहिली. त्यामुळे तलफ भागविण्यासाठी दोघा-तिघांनी एकत्र येऊन ‘टांगा’ करण्याचे प्रकारही ग्रामीण भागात सर्रासपणे बघायला मिळत होते. कुठेतरी आडबाजूला, कुपाटीला जाऊन पेग रिचवत उसने अवसान घेऊन हे मद्यपी थेट घरचा रस्ता धरायचे. कारण, पोटभर पिऊन धिंगाणा घालायला दारूचे दरच कुणाला परवडेनासे झाले होते. तीच स्थिती तंबाखू खाणाऱ्यांच्या बाबतीतही अनुभवायला येत होती. चौकातल्या पारावर एकमेकांमध्ये फिरवली जाणारी तंबाखूची पुडी विकत घेणे परवडत नसल्याने जो तो आपल्यापरीने स्टॉक करून तलफ भागवत होता. अनेक ठिकाणी तर महागाची दारू विकत घ्यावी लागते म्हणून दुकाने फोडून तेथील माल लंपास करण्याचे धारिष्ट्यही काही मद्यपींनी दाखविले होते.

सरकारबद्दल संतापाची भावना

यथावकाश कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी सरकारने मद्यविक्रीला परवानगी दिली. मात्र, अतिरिक्त महसूल जमा करणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे सर्वच मद्यपी स्वतःला अर्थव्यवस्थेचे पाईक समजू लागले होते. अर्थव्यवस्था डळमळीत होण्यापासून वाचविण्याचे श्रेय घेणाऱ्या या मद्यापींनाच सरकारने पुन्हा लक्ष्य केले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील सर्वच ठिकाणी देशी-विदेशी मद्याची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा खिशाला झळ बसू लागल्याने सहाजिकच मद्यपींमध्ये सरकारबद्दल संतापाची भावना आहे.

गुटखा व पानमसाल्याची विक्री जोरात

राज्यात गुटखा व पानमसाल्याचे उत्पादन करणे व विक्रीस प्रतिबंध आहेत. असे असले तरी शेजारच्या राज्यांमधून चोरट्या मार्गाने गुटखा व पानमसाला विक्रीसाठी आणला जातो. गावातील कोणत्याही दुकानात अथवा टपरीवर गुटखा मिळत नाही, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. गेल्या लॉकडाउनमध्ये गुटखा व पानमसाल्याच्या दरवाढीचा उच्चांक झाला होता. ‘ऊंचे लोग… ऊंची पसंद’ असणाऱ्या एकेका ब्रॅन्डचा गुटखा तर ५० रुपये देऊनही मिळत नव्हता. आतादेखील हीच परिस्थिती सर्वत्र बघायला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT