Officials and local members of Nashik Road Rotary while inaugurating the toilet building built for girls in the school esakal
नाशिक

Nashik News : आंतरराष्ट्रीय निधीतून मुलींसाठी शौचालय; वावी विद्यालयासाठी नाशिकरोड रोटरी क्लबचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर तालुक्यातील वावी येथे रयत शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयात नाशिकरोड रोटरी क्लबच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मुलींसाठीच्या सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. (Toilet for girls with international funds Initiative of Nashik Road Rotary Club for Vavi Vidyalaya Nashik News)

ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असते. त्यामुळे रोटरी इंटरनॅशनल च्या माध्यमातून मुलींसाठी सुविधायुक्त शौचालयांची उभारणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

वावी येथील विद्यालयासाठी सुमारे १६ लाख रुपये निधी रोटरी कडून उपलब्ध करून देण्यात आला होता. गेल्या डिसेंम्बर महिन्यात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता.१९) रोटरीचे ग्लोबल ग्रँट चेअरमन फिरदोस कपाडिया, नाशिकरोड रोटरी क्लबच्या अध्यक्ष वर्षा जोशी,

सेक्रेटरी ज्ञानेश्वर वर्मा, खजिनदार हेमंत सिद्धये, रिबा पाटील, धनंजय जोशी, विकास दिघे, रसिका दाणी, विवेकानंद देशपांडे, शंकर थुबे पाटील उपस्थितीत बांधकाम पूर्ण झालेल्या या शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले. शालेय समितीचे माजी अध्यक्ष कन्हैयालाल भुतडा, रयतच्या उत्तर विभाग सल्लागार समितीचे सदस्य विठ्ठल राजेभोसले,

सरपंच संदीप राजेभोसले, माजी सरपंच विजय काटे, अरुण भरीतकर, इलाहीबक्ष शेख, नंदलाल मालपाणी, कचरू घोटेकर, बाळासाहेब कहांडळ, विठ्ठल उगले, दिलीप कपोते, विजय गायकवाड, सुनील काटे, बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर, पांगरीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

रोटरी क्लब ऑफ बॉक्सहिल सेंट्रल, मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) मार्फत वावी विद्यालयात मुलींसाठी १९ शौचालय युनिट बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. बांधकामासाठी ८० टक्के निधी रोटरीचा तर २० टक्के निधी शाळेचा असे सूत्र होते.

या उपक्रमानतर्गत नाशिक जिल्ह्यातील १७ शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय उभारणीचे काम पूर्ण झाले असून आणखी काही शाळांमध्ये काम सुरू असल्याचे फिरदोस कपाडिया यांनी सांगितले. मुख्याध्यापक भाऊसाहेब कापडणीस यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक अहिलाजी गायकवाड यांनी आभार मानले.

"अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम असलेल्या शौचालयांमुळे विद्यार्थिनींची गैरसोय दूर होणार आहे. आमची जबाबदारी बांधकाम करून ते शाळेकडे हस्तांतरित करण्याची आहे. पुढील काळात या सुविधेचा योग्य पद्धतीने वापर करणे, शौचालयांची स्वच्छता व देखभाल करण्याची जबाबदारी सर्वतोपरी शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांची असणार आहे. रोटरीच्या प्रतिनिधींकडून या शौचालयांच्या व्यवस्थेची वेळोवेळी तपासणी देखील करण्यात येईल."

- वर्षा जोशी, अध्यक्षा, नाशिकरोड रोटरी क्लब.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT