Nashik Tomato Auction : बाजार समितीच्या हिवरगाव उपबाजारात टोमॅटो लिलाव सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी १५० वाहनांतून पाच हजार टोमॅटो क्रेट्स आवक झाली. एका क्रेटला एक हजार ३५१ रुपये दर मिळाला. (Tomato auction starts in Hivargaon sub market nashik)
माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, सभापती डॉ. रवींद्र पवार यांच्या उपस्थितीत लिलावास सुरवात झाली. संपत घुगे यांच्या टोमॅटो क्रेटला व्यापारी रिजवान शेख यांनी एक हजार ३५१ रुपयांचा दर दिला.
बाळासाहेब वाघ, सरपंच अरुण वाघ, संजय सानप, ज्ञानेश्वर गाडे, विठ्ठल राजेभोसले, सोमनाथ भिसे, नारायण वाजे, अरुण वारुंगसे, किरण डगळे, सरपंच ईश्वर माळी, सुदाम शेळके, केशव कोकाटे, सयाजी भोर, विक्रम वाजे, नंदू वाजे, सुनील भालेराव, बाजार समितीच्या उपसभापती सिंधूताई कोकाटे, संचालक श्रीकृष्ण घुमरे, नवनाथ घुगे, शरद थोरात, जालिंदर थोरात, सुनील चकोर, गणेश घोलप, रवींद्र शेळके, प्रकाश तुपे, नवनाथ नेहे आदी उपस्थित होते.
हिवरगाव उपबाजाराचा नावलौकिक सर्वदूर झाला आहे. बाजार समितीमार्फत यापुढे सर्व पायाभूत सुविधा व्यापारी व शेतकऱ्यांना पुरविल्या जातील, असे उदय सांगळे यांनी सांगितले. श्रीकृष्ण घुमरे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पोमनर यांनी आभार मानले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांचा फायदा
हिवरगाव सिन्नर व निफाड तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. शेतकऱ्यांना वेळ, श्रम, पैसा खर्च करावा लागणार नाही, या हेतूने हा उपबाजार सुरू करण्यात आला. प्रतवारी करून २२ किलो वजनासह क्रेट्समध्ये टोमॅटो विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्यास करा तक्रार
शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतीमालाचे पैसे रोख स्वरूपात व्यापाऱ्यांकडून घ्यावेत. पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांबाबत बाजार समितीकडे तत्काळ लेखी तक्रार करावी. फसवेगिरी करणाऱ्या तोतया व्यापाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.