Ganpatrao Patil Neighbor President Prashant Kad while starting the tomato auction in the sub market premises of Vani on Thursday. esakal
नाशिक

Tomato Auction: वणी उपबाजार आवारात टोमॅटो लिलावास प्रारंभ! 11 कॅरेटला प्रत्येकी 3351 रुपयांचा भाव

सकाळ वृत्तसेवा

Tomato Auction : दिंडोरी बाजार समितीच्या वणी येथील उपबाजार आवारात गुरुवारी (ता. २१) चालू हंगामातील टोमॅटो लिलावास प्रारंभ करण्यात आला.

शुभारंभा प्रसंगी लिलावात ठेवण्यात आलेल्या ११ शेतकऱ्यांच्या ११ कॅरेटला प्रत्येकी ३ हजार ३५१ रुपयांचा भाव देण्यात आला. (Tomato auction starts in Vani sub market premises 3351 each for 11 carats nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

वणी, सापूतारा रस्त्यावरील बाजार समितीच्या उपबाजार आवारात टोमॅटो खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील होते.

यावेळी सभापती प्रशांत कड यांनी टोमॅटो उत्पादकांनी आपला टोमॅटो शेतीमाल मोठा (एक नंबर), मध्यम, लहान (गोल्टी), बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला) अशी योग्य प्रतवारी करून २० किलोच्या कॅरेटमध्ये विक्रीस आणावा व व्यापारी वर्गानेही शेतकऱ्यांना मालानूसार चांगला भाव देण्याचे आवाहन केले.

बाजार समितीचे संचालक योगेश बर्डे यांनी बाजार समितीत ज्या सुधारणा करण्यात आल्या त्या बाबतीत माहिती दिली. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होतील अशी ग्वाही दिली.

श्री. पाटील यांनी बाजार समिती, व्यापारी व शेतकरी यांनी एकमेकांशी योग्य समन्वय साधून शेतकऱ्यांना अधिकाधिका सुविधा व शेतमालाला भाव देवून विकास साधावा असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित प्रमुख व्यापाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांनी आणलेल्या ११ कॅरेटचे विधीवत पुजन आणि नारळ फोडून लिलावास प्रारंभ करण्यात आला. या अकरा क्रेट्‍स साठी ३ हजार ३५१ रुपयांचा सर्वाधिक भाव विलास उंबरे या व्यापाऱ्याने देत खरेदी केले.

टोमॅटो उत्पादकांनी शेतकरी बाजार समितीत माल आणल्याने त्यांना व्यापाऱ्यांची वाट बघावी लागली तर काही व्यापाऱ्यांनी कॅरेटला ८० ते ६० रुपये भाव देत टोमॅटो खरेदी केला.

काही शेतकऱ्यांना अपेक्षीत भाव न मिळाल्याने काढता पाय घेतला तर काहींनी जे मिळेत ते पदरात पाडून घेणे पसंत केले.

कार्यक्रमासाठी वणी उपसरपंच विलास कड, वणी मर्चंट बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा, पोपटराव थोरात, गुलाबराव जाधव, नामदेवराव घडवजे, नंदलाल चोपडा, गंगाधर निखाडे, दत्तात्रेय राऊत, प्रकाश कड, बाळासाहेब घडवजे, सुनील बर्डे, सुनील थोरात, संजय कड, संपतराव कड, संजय उंबरे, भगवान पाटील, बबन आव्हाड आदींसह बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT