Damaged tomato crop in the field of farmer Shravan Sangle in manmad esakal
नाशिक

Crop Damage : पावसामुळे टोमॅटो मातीमोल; पिकांच्या नुकसानीमुळे संकट

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : सतत पडणारा पाऊस आता नकोसा झाला असून, पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांसह असंख्य शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पीक उत्तरा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी खराब झाले आहे. (tomato crop damage Crisis due to heavy rain in manmad nashik Latest Marathi News)

सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतर फळपिकेही धोक्यात आली आहेत. पिकांवर रोगांचे आक्रमण होत असल्याने महागडी औषध फवारणी करून शेतकरी वैतागले आहेत. जूनच्या प्रारंभपासूनच पावसाने दमदार सुरवात केली होती.

यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी केली होती. मका, बाजरी पिकांबरोबरच फळ शेतीदेखील बहरली होती. मात्र, परतीच्या पावसाने शेती पिकांची नासाडी सुरू केली आहे. टोमॅटो, शिमला, कोबी, फ्लॉवर यासह इतर भाजीपाला पिकांची नासाडी होत आहे. तर अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. फळवर्गीय पिकांची फुलकळी कुजून गेली आहे. अतिप्रमाणात पाऊस व पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे करपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

खरीप हंगामातील पीक अंतिम टप्प्यात आहे. मात्र, परतीच्या पावसाने पिकांची नासाडी होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. डाळिंब पिकाबरोबरच इतर फळ पिकावर याचा परिणाम दिसून येत आहे. पालेभाज्या व भाजीपाला सडू लागला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

"पावसाचा धडाका सुरू असल्यामुळे टोमॅटोला काळे डाग पडत असून, खराब टोमॅटो फेकून द्यावे लागत आहे. तर झाडांवर रोगांचा प्रार्दुभाव झाला असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा हतबल झाला आहे. सरकारने मदतीचा हात देण्याची गरज आहे." - श्रावण सांगळे, शेतकरी, बुधलवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT