Tomato Price Hike esakal
नाशिक

Tomato Rates Hike: टोमॅटोने बनविले चक्क करोडपती, लखपती! डोंगरकुशीत वसलेल्या धुळवडकरांचे कष्ट

सकाळ वृत्तसेवा

Tomato Rates Hike : शेती अन् शेतकऱ्यांना सहजासहजी निसर्गाची साथ मिळत नाही, पण निसर्ग शेतीला पावला, तर थेट शेतकरी करोडपती होतो. निसर्ग शेतकऱ्यांना बुडवतो अन् घडतोयही.

मात्र येथील टोमॅटोसारख्या पिकाने शेती समृद्धी केली. थेट शेतकरी कुटुंबात लक्ष्मी सोनपावलांनी आली आहे.

डोंगरकुशीत वसलेल्या धुळवड (ता. सिन्नर) येथील गावात टोमॅटोचे भरघोस उत्पादन घेऊन सुमारे वीस शेतकरी करोडपती अन् सुमारे १०५ शेतकरी लखपती झाले आहेत. (Tomato made farmers millionaires hardships of Dhulwadkars situated in hills nashik)

सातत्याने एकाच पिकांत नुकसान होऊन सातत्य ठेवल्याने व शेतात पाणीबचतीचे प्रयोग केल्याने करोडोंची माया घरात आली आहे. दापूरपासून चहूकडे डोंगरमाथा, त्यात वसलेल्या धुळवडला जाताना डोंगर, नागमोडी वळणाचा घाटरस्ता आहे.

लोकसंख्या दीड हजार आहे. डोंगराच्या गुंठागुंठाच्या शेतीने टोमॅटोचा सुवर्णकळस गाठला आहे. डोंगरात शेती असल्याने नैसर्गिक वातावरणनिर्मिती येथे आहे. भोजापूर धरण परिसरात जागा घेऊन विहिरी, जलवाहिनी केल्या.

दहा वर्षांच्या कालावधीनंतर धुळवडकरांनी शेतीत कोट्यवधी मिळविले. ज्या भोजापूर धरणाच्या पाण्यावरून आंदोलन रंगले, तेच धुळवड आता करोडपती झाले आहे. फक्त त्यांच्या कष्टाला निसर्गाने साथ दिली.

त्यात टोमॅटोला बाजारभाव मिळाला आहे. उन्हाळी वाण सहा हजार २४२ ने दोन हजारांपासून ते दोन हजार तीनशे या वाणाने तीन हजारांच्या पुढे भाव दिला आहे.

धुळवडहून थेट नाशिक, संगमनेर, पिंपळगाव बाजार समितीला मालविक्री होते. १५ ऑगस्टपर्यंत उन्हाळ टोमॅटो खुडे पूर्ण होतील. पुन्हा पावसाळी वाण सुरू होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धुळवडकरांना टोमॅटोने यंदा घरात समृद्धी आणली आहे. यामागे पाण्याचा सुयोग्य वापर आणि निसर्गाची साथही आहे. परतीच्या पावसाने भोजापूर धरणक्षेत्रात जे पाणी राहिले, त्यामुळे शक्य झाले आहे. त्याच जोडीला आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापरही महत्त्वाचा ठरला आहे, असे तेथील शेतकरी सांगतात.

"करोडपती, लखोपती बनविले आहे. पण गेल्या वर्षी पावसाने टोमॅटोचे खूप नुकसान केले होते. जे नेले ते भरून दिले आहे."- रमेश आव्हाड, शेतकरी, धुळवड

"धुळवडच्या शेतकऱ्यांच्या कष्टाला निसर्गाने साथ दिली. टप्प्याटप्प्याने लखपती झाले. आज सुमारे वीस करोडपती अन् लखपती आहेत." - एकनाथ आव्हाड, शेतकरी धुळवड

"भोजापूर धरण परिसरात खासगी जलवाहिनीने पाणी आणले. गावात शेततळे उभारले आहेत. पाणीबचत, बाजारभाव व एकाच पिकांमध्ये सातत्य हेच करोडपती, लखपती बनण्याचे यश आहे. धुळवडकरांचा कर्ज बोजा कायमचा मिटला आहे."

- दादा सांगळे, सरपंच व टोमॅटो उत्पादक, धुळवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT