Tomato given to animals as tomato fetches high prices esakal
नाशिक

Tomato Price Fall: टोमॅटोच्या नीचांकी दराने शेतकरी हतबल; 2 रुपये कवडीमोल भाव

सकाळ वृत्तसेवा

Tomato Price Fall : पावसाचे माहेरघर म्हणून मिरविणाऱ्या इगतपुरी तालुक्यात बळीराजाला आज पारंपारिक शेतीत घाम गाळून देखील उत्पादन मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर घेऊन नेहमीच उपजीविकेसाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. (Tomato Price Fall Farmers depressed by low price of tomato 2 at bargain price nashik news)

सध्या टोमॅटोचे भाव कमालीचे गडगडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले असल्याचे चित्र दिसत आहे. बळीराजा शेतात मेहनत करून स्वकर्तृत्वासह कौशल्याने उत्पादन मिळवतो. परंतु, समाधानकारक भाव मिळत नसल्याने आर्थिक चणचण त्याच्या नशिबी आहे.

इगतपुरी तालुक्यात चक्क टोमॅटो शेतकऱ्यांना एक दोन रुपये कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. मातीमोल भाव मिळाल्याने काही भाजीपाला निराश झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सडत आहे.

दौंडत येथील शेतकरी सागर गावंडे यांनी संताप व्यक्त करीत शेतीत चरण्यासाठी मेंढ्या सोडल्या आहेत. नीचांकी बाजारभावामुळे शेतकऱ्याचे आर्थिक स्रोत बिघडले आहेत. याच मालाचे बाजारात अगदी कवडीमोल भाव झाल्याने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले आहे. शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वाहतूक खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. अनेक दिवसांपासून घसरण सुरू असल्याने शेतीत पिकवलेले टॉमेटो जनावरांचे खाद्य बनले आहे. शेतीसाठी लागणारे खते, बी बियाणे, औषधे, महाग झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

बाजारात भाजीपाल्याची पडझड झाल्याने शेतकरी चिंतातूर झालेले आहेत. मंदीची लाट डोके चालवू देत नाही. झालेला खर्च निघत नाही, भाजीपाला विकेल याची अजिबात शाश्वती राहिली नाही. इथून पुढे शेतकऱ्यांची शेतीत काय नियोजन करायचे कोणते पीक घ्यायचे या संभ्रमात शेतकरी सापडला आहे.

"शेतकरी मोठ्या अपेक्षेने पारंपारिक शेती करून बागाईत पिके घेतात. मात्र दर कमी झाल्यामुळे मजूर खर्चही निघत नाही. बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेती करण्यासाठी खूप मोठा खर्च लागतो. बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांचे लागवडीचे खर्चपण निघत नाही. खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही."

- बाळासाहेब वाजे, शेतकरी, खेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT