A farmer from Khamkheda, Saadhan Aher, left the sheep and cattle to graze in the standing crop due to lack of price for the tomato crop. esakal
नाशिक

Tomato Price Fall : टोमॅटोला बाजारभाव नसल्याने उभ्या पिकात सोडली जनावरे

सकाळ वृत्तसेवा

Tomato Price Fall : टोमॅटोला सध्या मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवडीपश्‍चात आता फळतोडणी सुरू झाली असताना तोडणी केलेला माल बाजारात न्यायलासुद्धा परवडत नाही, अशी बिकट परिस्थिती आहे.

त्यामुळे उद्विग्न होत येथील समाधान कडू आहेर या शेतकऱ्याने टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या आणि जनावरे चरायला सोडली. (Tomato Price Fall no market price for tomatoes animals left in standing crop to destroy by farmer nashik news)

समाधान आहेर यांनी दोन एकरमध्ये दोन लाख रुपये खर्च करत टोमॅटोची लागवड केली होती. मात्र सुरवातीला दीडशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. पहिल्या-दुसऱ्या तोड्यालाच चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव मिळू लागल्याने उद्विग्न होत श्री. आहेर यांनी फळ तयार असलेल्या पिकात मेंढ्या, तसेच जनावरांना चारावयास सोडून दिले.

टोमॅटोचा बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या चाळीस ते पन्नास रुपये बाजार मिळत आहे. टोमॅटोच्या एका क्रेटला बाजारात नेण्यासाठी तोडणीकरिता २५ रुपये, हाताळणी व प्रतवारीसाठी वीस व वाहतूकखर्च पंधरा ते वीस रुपये, असा सर्वमिळून साधारणतः ६५ ते ७० रुपये खर्च होतो.

काही शेतकऱ्यांची खर्चाची देखील तोंडमिळवणी होत नसल्याने पीक सोडून देण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. एक एकर टोमॅटो पिकासाठी साधारणतः एक ते सव्वा लाख रुपये खर्च येत असून, बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडून कर्जबाजारी झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी टोमॅटोच्या पिकात मेंढ्या, तसेच जनावरे चरताना दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे फळे लवकर परिपक्व होत असल्याने आवक वाढत आहे.

मागणी कमी व परराज्यातील व्यापारी कमी असल्याने बाजारभाव गडगडल्याने टोमॅटो तोडून विकण्यासाठी देखील घरातून पैसा जात असल्याने समाधान आहेर यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर मेंढ्या सोडल्या आहेत.

'टोमॅटोला सध्या मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवडीपश्‍चात आता फळतोडणी सुरू झाली असताना तोडणी केलेला माल बाजारात न्यायालासुद्धा परवडत नाही, अशी बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे पिकात मेंढ्या सोडल्यात."

- समाधान आहेर, टोमॅटो उत्पादक, खामखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT