चांदवड (दि. नाशिक) : चांदवड शहर व परिसरात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह (storm) गारांच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शहरासह परिसराला अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे कांद्याच्या शेडमध्ये (Onion Storage) थांबलेल्या माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या अंगावर शेड कोसळल्याने ते जखमी झाले, तर सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे घराचे छप्पर कोसळले. (torrential rains Crops damaged in chandwad Nashik News)
वादळी पावसाने चार कांद्याचे शेड पूर्णपणे जमीनदोस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर स्वयंवर मंगल कार्यालयाची भिंत कोसळली. अनेक झाडे कोसळली. राहुड येथील रवींद्र बोरसे हा युवक जखमी झाला. आदित्य फलके, पारसशेठ, कमलाकर बच्छाव व पिंटूशेठ कोतवाल या कांदा व्यापाऱ्यांचे शेड जमीनदोस्त झाले. अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांवर झाडे पडून नुकसान झाले. पहिल्याच पावसात चांदवड शहरातील गटारी तुडुंब भरून वाहत होत्या.
मालेगाव शहर व परिसराला गुरुवारी वादळीवाऱ्यासह पावसाने झोडपले. पहिल्याच पावसात साडेतीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. कळवाडी गटात कांदाचाळ, घरे, शाळांचे मोठे नुकसान झाले. घरे व शाळांची पत्रे उडाली. कळवाडी, नरडाणे, साकूरला मोठे नुकसान झाले आहे. कळवाडी येथील प्रशांतनगर येथे विजेचा खांब व तारा पडल्या. या भागातही वीजपुरवठा विस्कळित झाला. नरडाणे येथील शेवगा पिकांचे नुकसान झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.