Singers, instrumentalists and kirtankars attending Balaiduri taluka level Varkari Mahamandal meeting. esakal
नाशिक

Nashik News: इगतपुरी तालुक्यात 28 पासून वारकऱ्यांचा दौरा; स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचा पुढाकार

विजय पगारे

इगतपुरी : वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी संप्रदाय सरसावला असून, विठू नामाचा जयघोष करीत गावागावांत जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.

येत्या २८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या वारकरी दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बलायदुरी येथील स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे भागवताचार्य विजय महाराज चव्हाण यांनी केले आहे. (Tour of warkars in Igatpuri taluka from 28 initiative of Swanand Warkari Education Institute Nashik News)

बलायदुरी येथे तालुक्यातील सर्व वारकरी गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकारांची बैठक झाली. तीत इगतपुरी तालुक्यातील वारकरी दौऱ्या नियोजन करण्यात आले. भागवताचार्य विजयबाबा चव्हाण यांनी ही संकल्पना मांडली.

त्यास सर्वांनी प्रतिसाद दिला. व्यसनांमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत. वाढत्या व्यसनांना आळा घालण्यासाठी टाळ मृदंगच्या गजरात प्रत्येकाला संदेश देण्यात येणार असून, वारकरी संप्रदायाची पताका मजबूत करण्यात येणार आहे.

वारकरी दौऱ्यात नवनवीन गायक, वादक, कीर्तनकार, टाळकरी यांचा शोध घेऊन त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी संधीही देण्यात येणार आहे.

तालुक्यातील माणिकखांब, खंबाळे, वाकी, घोटी, देवळे, खैरगाव, शेनवड, खडकवाडी, कांचनगाव, औचितवाडी, तळोघ, तळोशी, प्रिंप्रीसदो, नांदगाव सदो, फांगुळगाव, मानवेढे, गिरणारे, टिटोली, बोरटेंभे या गावांतून वारकरी दौरा सुरू होईल.

त्यात भजन करत अनेक वारकरी सहभागी होतील. रस्त्याने जाताना सकाळी एखाद्या गावात नाश्ता, तर दुपारी एखाद्या गावात जेवण होईल. सायंकाळी एखाद्या गावात प्रवचन होईल. नंतर जे गाव लागेल, त्या गावात मुक्काम होईल, असे नियोजन करण्यात आले.

हरिपाठ, कीर्तन, जेवण व मुक्काम होईल. पहाटे काकडा भजन होई. नियोजित गावापासून नियोजित गावापर्यंत प्रवास राहील. शेवटी टाकेघोटी येथे काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल, असे विजय चव्हाण महाराजांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT