Nashik News : निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या इगतपुरी तालुक्यासह परिसरात सध्या जोमाने श्रावणसरी व संततधार बरसत आहे. यामुळे सगळीकडे गर्द हिरवाई दाटल्याने सोबतच सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे तालुक्यातील धरणे, धबधबे वाहत आहेत.
त्यामुळे श्रावणसरींची मनसोक्त मौज घेणाऱ्या पर्यटकांसह हौशी पर्यटक व गिर्यारोहक आकर्षित होत आहेत. त्यातल्या त्यात प्रवरा नदीवरील भंडारदरा धरण, तसेच रंधा फॉलकडे पर्यटकांची पसंती असल्याने व सलग सुटी असल्याने पर्यटकांची तौबा गर्दी होत आहे. (Tourists come in great numbers to Bhandardara with Igatpuri nashik news)
कसारा घाटातील दाट धुके, रेल्वेचे बोगदे, दाट व हिरवेगार डोंगर, निसर्गसौंदर्याने नटलेले वळणावळणाचे रस्ते, पावलापावलावर प्रवाहित झालेले धबधबे, डोंगररांगा, जलाशय, हिरवीगार झाडे, शुद्ध आणि तितकीच थंड हवा आणि अंगावर रोमांच उभा करणारा पाऊस व मनमोहक वातावरण इथल्या सौंदर्यात अजूनच भर टाकत असल्याने पर्यटकांची दोन-तीन दिवसांपासून एकच झुंबड उडत आहे.
भंडारदरा धरणावरही गर्दी
नाशिक व नगर जिल्ह्याच्या सीमेलगत असणारे भंडारदरा धरण हे तमाम पर्यटकांचे पावसाळ्यातील प्रथम पसंतीचे स्थान बनले आहे. त्यामुळे भंडारदरा अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटनस्थळ असून, दर वर्षी विविध ठिकाणांहून येथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
विशेष म्हणजे बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असून, हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. तसेच शेंडी या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला रंधा फॉल प्रसिद्ध आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
धबधबे ठरताहेत आकर्षण
इगतपुरी शहरालगत असणाऱ्या कसारा घाटात पावसाळ्यात अनेक ठिकाणी धबधबे निर्माण होतात. अशोका धबधबाही प्रवाहित झाला असून, एक रोमांचित करणारा अनुभव करून देतो. पर्यटक सध्या ठिकठिकाणी लहान-मोठे धबधबे आणि डोंगररांगावरील कोसळणाऱ्या पाण्याचा मनसोक्त आनंद परिवारासह घेत आहेत. दरम्यान, परिसरातील माळरानावर बहरलेल्या वनराईच्या सानिध्यात फोटो आणि सेल्फी घेण्याचा आनंद घेत आहेत.
व्यावसायिकांना सुगीचे दिवस
इगतपुरीतील भावली धरण व धबधब्यांसह भंडारदरा धरणाकडे पर्यटक आकर्षित झाले आहेत. घोटी ते भंडारदरा या राज्यमार्गावर असणारी छोटीमोठी हॉटेलात पर्यटकांची गर्दी वाढत असते. दर वर्षी या भागात वाहनांच्या दूरवर रांगा लागतात.
त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची जणू दिवाळीच असते. परंतु रस्त्यांची बिकट अवस्था पाहता यंदा पर्यटकांची संख्या हवी तितकी दिसत नाही. रस्ता दुरुस्ती लवकर झाली नाही, तर पर्यटक कमी होतील, अशी निराशाजनक प्रतिक्रिया येथील हॉटेल व्यावसायिक देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.