Tractor turned on two acres of cabbage  esakal
नाशिक

Nashik: शेतातील उभ्या कोबीवर फिरविला ट्रॅक्टर! अंबडमधील कंपन्यांच्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे पिके जळाली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबड औद्योगिक वसाहतीत प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या शेकडो कंपन्यांवर कारवाईचा बडगा उचलत अनेक कंपन्या बंद केल्यानंतरही अनेक कंपन्यांमधील रासायनिक सांडपाणी आजही उघड्या नाल्यांत सोडले जात आहे.

याच प्रकारांतून स्थानिक शेतकरी शेतातील पिके जळत असल्याचा आरोप करत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पिकांचे नुकसान झाल्याने ऊभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरविला आहे. (tractor drive on standing cabbage in field by farmer Crops burnt due to chemical effluents from companies in Ambad nashik news)

अंबड गावातील शेतकरी अरुण भास्कर दातीर यांनी दोन एकर शेतात कोबीची लागवड केली होती. रसायनयुक्त पाण्यामुळे त्यांच्या शेतातील कोबीचे अख्खे पीक जळाल्याने सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.

हे पीक खाण्याच्या लायकीचेही उरले नसल्याने त्यांनी रागाच्या भारत संपूर्ण शेतात ट्रॅक्टर फिरविले. गावातील नामदेव शिरसाट, विष्णू शंकर दातीर, नामदेव धोंडीराम दातीर, शांताराम पडोळ, सुभाष शिरसाट, गोविंद शिरसाट, अशोक शिरसाट, संतु मोरे या शेतकऱ्यांनीही असेच नुकसान झाल्याचा दावा केला आहे.

हे शेतकरी पाणी व जमिनीचे परीक्षण करून, त्यानंतर महापालिका प्रशासनावर दोनशे कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे या शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या व्यावसायीक व औद्योगिक नियमांची पायमल्ली करत असून, प्रदूषण नियंत्रण मंडळही याकडे सर्रास कानाडोळा करत आहे, तर काही अधिकारी आर्थिक देवाण घेवाण करीत उद्योजकांवर मेहेरनजर ठेवत असल्याचादेखिल आरोप केला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कारवाई का होत नाही?

कंपन्यांमधील सांडपाणी थेट उघड्या नाल्यांत सोडले जात आहे. हेच पाणी परिसरातील १० किमी भागात झिरपते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या विहिरींमध्ये हे रसायनमिश्रित पाणी येते.

शेतकऱ्यांची शेती पिके या पाण्यामुळे जळून जात आहेत. प्रशासाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, अनेक वेळा आंदोलने करूनही या गंभीर बाबीसंदर्भात कठोर पाउल का उचलले जात नाही? असा प्रश्‍नही स्थानिक रहिवासी उपस्थित करीत आहेत.

बेकायदा विल्हेवाट

कोणत्याही कंपनीला रासायनिक सांडपाणी असे उघड्यावर सोडता येत नाही. त्यासाठी कंपनीतच शुद्धीकरण यंत्र असणे गरजेचे आहे. कंपनीत हे यंत्र नसल्यास त्यावर कार्यवाही करणे अपेक्षित असते.

मात्र, अनेक कंपन्यांमध्ये इटीपी प्लांट नावाला दाखवत दूषित पाणी एखाद्या गाडीत भरून बाहेर कुठेतरी नैसर्गिक नाल्यांमध्ये अथवा नदीपात्रांत टाकण्यात येत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.

एवढेच नव्हे, तर अनेक कंपन्यांमध्ये दिवसभराचे काम संपल्यानंतर कंपनीच्या सभोवताली अनधिकृत शोष खड्डे तयार करून रात्रीच्या वेळी त्यात केमिकलयुक्त पाणी सोडून दिले जाते. हे पाणी नाल्यांमध्ये जात नसले, तरी जमिनींमध्ये मुरत असून शेती योग्य सुपीक जमिनी नापीक होत असल्याचेही सांगण्यात येते.

"यापूर्वी औद्योगिक वसाहतीत जमिनी गेल्या. आता उरलेल्या जमिनीत शेती कशी करायची? असा प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी व्यवसाय थाटल्यास त्यांना वेठीस धरण्यात येते. त्यामुळे सर्व शेतकरी एकत्रित येऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पायी मोर्चा काढणार आहोत."

-साहेबराव दातीर, अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समिती

"कोबीच्या लागवडीसाठी ५ लाख रुपयांपर्यंत खर्च केला. परंतु, सगळे पीक जळाले. संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागला. असेच सुरु राहिले तर जगायचं कसं? असा प्रश्‍न आहे. लहान-लहान लेकरं- बाळं असून, त्यांचं संगोपन कसं करायचं? याचेही उत्तर प्रशासनाने द्यावे."

-अरुण भास्कर दातीर(शेतकरी)

"अनेकवेळा पाठपुरावा करूनही या गंभीर बाबीकडे कानाडोळा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्‍न आहे. त्यामुळे आता सगळे शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पायी मोर्चा नेणार असून, येथील सत्य परिस्थिती कथन करणार आहोत." -शांताराम फाडोळ, सामाजिक कार्यकर्ते तथा स्थानिक रहिवासी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT