Navnath in Bohada festival esakal
नाशिक

Nashik Bohada Festival: चांदोरी येथे आजपासून पारंपरिक बोहाडा उत्सव! संस्कृती संवर्धनाचा स्तुत्य प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bohada Festival : जिल्ह्यातील गोदाकाठी वसलेल्या चांदोरी गावात गुरुवारपासून (ता.२९) 'बोहाडा' अर्थात आखाडी उत्सवास सुरवात होत आहे. गेल्या ३०० वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा उत्सव 'बोहाडा' म्हणून ओळखला जातो.

हा उत्सव आषाढ महिन्यात सुरवात होऊन साधारणतः १३ दिवस हा चालतो. यावर्षी खालच्या आळीस म्हणजेच मारुती मंदिर परिसरात हा उत्सव होणार आहे. (Traditional Bohada Festival from Today at Chandori laudable effort to promote culture nashik)

अंगाला झोंबणारा गार वारा, गडद अंधारातही चैतन्यदायी प्रकाश देणारे टेंभे, संबळ, पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक कर्णमधुर वाद्यांच्या तालावर लयबद्ध पदन्यास करीत नृत्य करणारी विविध देवदेवतांची सोंगे आणि शेवटी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघालेल्या देवीच्या सोंगाची घरोघर पूजा करणारे ग्रामस्थ अशा आगळ्यावेगळ्या वातावरणात गेली अनेक वर्ष बंद असलेल्या आखाडी (बोहाडा) उत्सवाची परंपरा चांदोरीकरांनी गेल्या वर्षांपासून पुनर्जीवित केली आहे.

पर्जन्याच्या आर्जवासाठी ग्रामीण भागात पूर्वी आखाडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता; मात्र काळाच्या ओघात ग्रामीण भागातून हे उत्सव बंद पडू लागले. चांदोरीकरांनी त्याचे पुनर्जीवन करून मुबलक पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी बोहाडा उत्सव साजरा करताना पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले जाते.

मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे 'बोहाडा' हा समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवाला सुरवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावरती मिरवणूक काढली जाते.

काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली (टेंभे) पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात. कागदाचा लगदा व जंगली झाडपाला वापरून देव- दानवांचे मुखवटे तयार केलेले असतात.

शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोंगे काढली जातात. गणपती, सरस्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबूमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्रमराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासूर-मोहिनी, इंद्रजित-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासूर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली जाते.

त्यानंतर जगदंबा व महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणुकीने यात्रेची सांगता होते. बोहाडा महोत्सव शांततेत व सुरळीत पणे पार पाडण्यासाठी पंच कमिटी ग्रामपालिका चांदोरी आदी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चांदोरीच्या बोहाड्याची वैशिष्ट्ये

१.बोहाडामध्ये भाग घेतलेल्या सोंगांना नटवले जाते.

२.बोहाड्याची सुरवात गणपतीच्या सोंगाने होते.

३.ठराविक सोंग सोडले तर लिलाव पद्धतीने सोंगे घेतली जातात.

४.बोहाडा सादर होताना ग्रामस्थांची तुफान गर्दी हे दरवर्षीचे चित्र आहे.

पहिल्याच दिवशी निघणारी सोंगे

१) सारजा गणपती,

२) अही रावण-मही रावण

३) राक्षस पार्ट

४) प्रभावळ

५) एकादशी

"बोहाडा या लोककलेच्या माध्यमातून संस्कृतीची माहिती मिळून ग्रामस्थांचे मनोरंजनही होते. इतर ठिकाणी बंद होत चाललेल्या प्रथा परंपरा मात्र चांदोरी ग्रामस्थांनी जोपासल्या आहेत. चांदोरीसह परिसरातील ग्रामस्थांनी हा महोत्सव बघण्यास अवश्य यावे."

- पंच कमिटी, बोहाडा महोत्सव, चांदोरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT