Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वाहतुकीचे नियोजन हा महत्त्वाचा भाग असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेत ट्रॅफिक सेल कार्यान्वित केला जाणार आहे.
ट्रॅफिक सेलसाठी कार्यकारी अभियंता, उपअभियंत्यासह सहायक अभियंता दोन तसेच कनिष्ठ अभियंता चार अशा एकूण आठ पदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली. (Traffic cell in Municipal Corporation for Kumbh Mela nashik news)
२०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यासाठी महापालिकेने जवळपास ११, ००० कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे, तर जिल्हा प्रशासनाकडूनदेखील आराखड्याची तयारी सुरू आहे. राज्य शासनाने दोन दिवसापूर्वी सिंहस्थ कामासाठी शिखर समिती स्थापन केली. शिखर समितीबरोबरच चार विविध समित्यांचे गठणदेखील करण्यात आले आहे.
सिंहस्थामध्ये वाहतूक हा विषय महत्त्वाचा असतो. त्यामुळे राज्याच्या नगर विकास विभागाकडून महापालिकेला पत्र पाठविण्यात आले. त्यात वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी सर्वंकष आराखडा तयार करून ट्रॅफिक सेलची निर्मिती करावी, अशा सूचना आहे. महापालिकेने आराखडा केला, परंतु मंजुरी नसल्याने ट्रॅफिक सेलची निर्मिती झाली नाही.
सेवाप्रवेश नियमावलीला शासनाने नुकतीच मंजुरी दिली. त्यातही ट्रॅफिक सेलसाठी कार्यकारी अभियंता उपअभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश करण्यात आलेला नाही.
त्यामुळे महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदर्भ देत ट्रॅफिक सेलचे निर्मिती केली आहे व त्यासाठी कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची प्रत्येकी एक पदे, तर सहाय्यक अभियंता अशी दोन पदे निर्मितीला मंजुरी दिली आहे. कनिष्ठ अभियंत्यांच्या चार पदांना मंजुरी दिली असून, आता सदरचे मंजूर प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविले जाणार आहेत.
ट्रॅफिक सेलची कामे
- रस्तावर सायकल ट्रॅक, फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंगची निर्मिती.
- सार्वजनिक वाहतुकीसाठी डेपो, टर्मिनल, शेल्टरची उभारणी.
- पूल, बांधकामांची उभारणी ब्लॅक स्पॉट निर्मूलन.
- गर्दीच्या वेळी मार्गक्रमणांमध्ये बदल करणे.
- सर्वंकष वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करणे.
- वाहनतळांचा निर्मिती, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण.
- सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.