Private vehicles, rickshaws are parked at the Citylink bus stop itself, due to which City Link buses are seen stopping on the Bhar road. esakal
नाशिक

Nashik Parking Problem: पार्किंगमुळे स्मार्ट रोडवर वाहतूक कोंडी! वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Nashik Parking Problem : त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्ता स्मार्टसिटी प्रकल्पातंर्गत स्मार्ट रोड करण्यात आला असला तरी तो अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे.

अगदी मेहेर बसथांब्यावरच खासगी वाहने पार्क केली जात असल्याने शहर बसलाही थांबायला जागा मिळत नाही. त्यामुळे भररस्त्यात बस थांबल्याने लांबपर्यंत वाहतुकीची कोंडी होते. ही बाब नित्याची झाली असतानाही त्याकडे वाहतूक पोलिस सोईस्कररीत्या दुर्लक्ष करतात.

त्यामुळे त्याचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे. (Traffic congestion on Smart Road due to parking Ignorance of traffic police nashik news)

रस्त्याच्या दुतर्फा प्रशस्त पादचारी रस्ता आणि लगत सायकल ट्रॅक अशी अभिनव कल्पनेने स्मार्ट रोड साकारला. परंतु या स्मार्ट रोडवर सर्वाधिक वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग होते. दुतर्फा अनधिकृतरीत्या चारचाकी वाहनांची पार्किंग केली जाते.

ज्याकडे वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभापर्यंत रस्त्यालगत अनेक खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. याच ठिकाणी शहर बसचा मेहेर बसथांबा आहे.

गुरुवारी (ता. २२) दुपारी बसथांब्यासमोरच बेशिस्त कारचालकाने कार पार्क केली होती आणि चालक व त्याचे साथीदार हे खाद्यपदार्थांच्या दुकानात वड्याचा आस्वाद घेत होते. त्याच वेळी सीबीएस सिग्नलकडून अशोकस्तंभाच्या दिशेने शहर बस आली.

मात्र या बसला बसथांब्यासमोर थांबण्यासाठी जागाच नव्हती. बसच्या जागेवर कार अनधिकृतरीत्या पार्क केली होती तर कारच्या मागे दुचाकी आणि पुढे रिक्षा उभी होती. त्यामुळे बसचालकाला रस्त्याच्या मधोमध बस थांबविल्याशिवाय पर्याय नव्हता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर, बसथांब्यावर थांबलेल्या प्रवाशांनाही बसपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनाही कसरत करत बस गाठावी लागली. बस रस्त्यातच थांबल्याने बसच्या पाठीमागे असलेल्या शहर बससह अन्य वाहनांची लांबपर्यंत रांग लागली.

या वाहतूक कोंडीमुळे मेहेर सिग्नल यंत्रणा कोलमडून पडली. या स्मार्ट रोडवरील अनधिकृतरीत्या पार्किंग करणाऱ्या वाहनांवर आणि वाहतुकीला खोळंबा करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी त्रस्त वाहनचालकांनी केली आहे.

पोलिस फिरकतच नाही

अशोक स्तंभ आणि सीबीएस सिग्नलवर नियुक्तीवर एकापेक्षा अधिक वाहतूक पोलिस असतात. परंतु स्मार्ट रोडवर कितीही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली तरीही या दोन्ही ठिकाणी नियुक्तीवर असलेले वाहतूक पोलिस त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करतात.

त्यामुळे या पोलिसांचे बेशिस्त रिक्षाचालक, व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT