Nashik Parking Problem : जुन्या मुंबई- आग्रा महामार्गावरील त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रोड अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे. स्मार्ट रोडच्या दुतर्फा अनधिकृतरीत्या चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते.
त्यातच पहिला श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची पंचवटीकडे जाण्यासाठीही गर्दी होती. त्याच सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
तर दुसरीकडे वाहतूक सिग्नलवर असलेल्या वाहतूक पोलिसांकडून मात्र अनधिकृत पार्किंग व कोंडीकडे सोईस्कररीत्या काणाडोळा केला जातो. (Traffic department negligence towards unauthorised parking Confusion on Smart Road nashik)
स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्ता कोट्यवधींचा निधी खर्च करून स्मार्ट रोड करण्यात आला. परंतु, रस्ता नावालाच स्मार्ट रोड राहिला असून रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे स्मार्ट रोडची पुरती वाट लागली आहे.
स्मार्ट रोडच्या दुतर्फा प्रशस्त फुटपाथ करण्यात आला आहे. या लगतच सायकल ट्रॅक बनविला आहे. परंतु फुटपाथवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांवरूनच जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते आहे.
तर, सायकल ट्रॅकवर अद्यापपर्यंत एकही सायकल न धावलेली नाही. उलट या सायकल ट्रॅकचा वापर चारचाकी वाहने पार्क करण्यासाठी होतो आहे. त्यामुळे बसविलेले मार्कचेही नुकसान झाले आहे.
मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ रस्त्यावरील फुटपाथवर तर व्यावसायिकांनीच ठाण मांडले आहे. मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची दुकाने असल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने पार्क करतात.
यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वारंवार कोंडीची समस्या उद्भवते आहे. यावर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून सोईस्कररीत्या काणाडोळा केला जातो. परंतु त्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एकदाच कारवाई
शहर वाहतूक शाखेच्या पथकाने दोन आठवड्यापूर्वी स्मार्ट रोडवरील अनधिकृतरीत्या पार्क केलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांवर इ-चलनाद्वारे कारवाई करीत ऑनलाइन दंड आकारला होता.
त्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे स्मार्ट रोडवरील कोंडीची समस्या सुटण्यास मदत तर झालीच शिवाय, अनेकांनी समाधानही व्यक्त केले होते.
परंतु त्याचवेळी महात्मा गांधी रोडवरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई केल्याने तेथील व्यावसायिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर, पोलिसांनी एकदाही या अनधिकृत पार्किंगवरील कारवाईकडे पाठ दाखविली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.