Nashik city Nirbhaya squad relishing vada pav while stopping at Meher bus stand on Smart Road. esakal
नाशिक

Nashik News : अजबच आहे सारं...‘निर्भया’ पोलीसांना वडापाव खाऊ द्या अन् वाहतूक कोंडी होऊ द्या!

महिला पोलीस असल्याने कोणाची बोलायचाही होईना टाप

नरेश हाळणोर

नाशिक : आधीच स्मार्ट रोड अनधिकृत पार्किंग, रिक्षाथांब्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच. ऐरवी रस्त्याच्या मधोमधच एखादं वाहन उभं राहिले तर त्या मागची वाहने हॉर्नवर हॉर्न वाजवितात.

मात्र पोलीस वाहन तेही महिला पोलीसांच्या निर्भया पथकाचेच वाहन बसथांब्यावरच थांबले अन्‌, वाहनातील पोलीस अधिकारी-कर्मचारी वडापावचा आस्वाद घेत असल्याने मागे थांबलेल्या एकाही वाहनचालकाने हॉर्न वाजविण्याची हिमंतच केली नाही.

करणार तरी कशी, महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी वडापावचा आस्वाद घेत होत्या, त्यात अडथळा आला असता तर....

(traffic jam at smart road in city due to Nirbhaya police eating vada pav on street Nashik News)

वाहतूक कोंडी

शनिवारी (ता. ४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नाशिक शहर पोलीस निर्भया पथकाचे वाहन (एमएच १५ एए ३०९४) स्मार्ट रोडवरील अशोकस्तंभाच्या दिशेने आले आणि मेहेर बसथांबा येथे थांबले. निर्भया वाहनात चालक महिला व महिला अधिकारी दोघीच होत्या.

त्यांनी बसथांब्यानजिकच्या विक्रेत्याकडून वडापाव घेतला. निर्भया वाहन बसथांब्यावर असल्याची आणि तेही रस्त्याच्या कडेला न थांबता मधोमध असल्याची पूर्ती जाणीव वाहनातील महिला पोलिसांना होती.

तरीही वडापाव खाण्यामध्ये त्या दोघीही इतक्या मग्न झाल्या होत्या की त्यांना पाठीमागे सिटीलिंकच्या बसेससह अन्य वाहनांच्या रांगा लागल्या आहेत याचाही विसर पडला होता. एवढचे नाही, तर सिटीलिंक बसलाही थांबण्यासाठी जागा नसल्याने त्या बसेस पाठीमागेच थांबत होत्या.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

महिला पोलीस असल्याने कोणाची बोलायचाही होईना टाप!

त्यामुळे बसथांब्यावर असलेल्या प्रवाशांना बस पकडण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. ही सारी गंमत निर्भया पथकातील दोन्ही महिला पोलीस पाहातही होत्या. पण त्यांना कसलीही घाई नव्हती की कशाचीही तमा नव्हती.

विशेष म्हणजे, पोलीस वाहनच रस्त्यावर थांबलेले असलेल्याने पाठीमागील एकाही वाहनाने हॉर्न वाजविण्याचीही हिमंत केली नाही.

काही दुचाकीस्वार तर पोलीस वाहनाच्या दोन्ही बाजुने मार्ग काढून निघत होते अन काही चालकांनी तर मागे वळून वाहनातील महिला अधिकाऱ्यांकडे कटाक्षही टाकला. पण, या महिला पोलीसांना कदाचित वडापाव पलिकडे काहीही दिसत नसावे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT