reference traffic jam esakal
नाशिक

काट्या मारुती चौकात वाहतूक कोंडी नित्याची

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : विभागतील काट्या मारुती चौकात वाहतूक कोंडी (Traffic) नित्याची बाब झाली आहे. सिग्नल यंत्रणा ही नावाला असून, नेहमीच बंद असते. या चौकात चारही बाजूंनी वाहनांचा मुक्त संचार असतो. पादचाऱ्यांसह वाहनचालकांना रस्ता ओलांडताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांकडून होत आहे. (Traffic jams at Katya Maruti Chowk Nashik News)

काट्या मारुती चौक परिसर हा अत्यंत वर्दळीचा आहे. या चौकातून हिरावाडी, मुंबई- आग्रा महामार्ग, औरंगाबाद रोड, तपोवन तसेच पंचवटीत जातो. भक्त भाविकांचीही या मार्गाहून वर्दळ असते. तसेच या भागात शाळा, कॉलेजही अधिक आहेत. परिणामी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची येथे कायमच मोठी वर्दळ असते. मात्र, येथे चोहोबाजूंनी एकाच वेळी येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता क्रॉस करताना विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय या रस्त्यालगतच पेट्रोलपंप आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो.

वाहतुकीचे नियम धाब्यावर

निमाणी बसस्थानक या मार्गावर आहे. त्यामुळे सिटी लिंक बसचीही कायम वर्दळ असते. या परिसरातून पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील रस्ता मुंबई-आग्रा महामार्गाला जोडतो. मोठ्या प्रमाणात नागरिक या मार्गाचा वापर करतात. शिवाय हा मार्ग ‘वन वे’ असूनही वाहनचालक चुकीच्या मार्गाने वाहतूक करतात. या वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून मार्गक्रमण होत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

"काट्या मारुती चौकात बसविलेली सिग्नल यंत्रणा वाहनचालकांना दिसेल अशी असावी. त्यानुसार योग्य नियोजन करून ती कार्यान्वित करण्यात यावी. तसेच हिरावाडी परिसर विकसित होत असून, रिंग रोडमुळे या रस्त्याचा वापर वाढला आहे. काळानुसार या ठिकाणी छोटेखानी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे." -विजय राऊत

"वाहतूक कोंडी नित्याची असून, या ठिकाणी छोटे- मोठे अपघात होत असतात. त्यासाठी लागलीच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. पंचमुखी हनुमान मंदिराकडून एकतर्फी वाहतूक व्हावी. असे केल्यास नक्कीच वाहतूक कोंडी कमी होऊन अपघाताचे प्रमाणही घटेल."

-सचिन दप्तरे, सामजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT