Crowd gathered at Ramkunda on Monday morning to pray to the sun. esakal
नाशिक

Nashik News: रामतीर्थावर वाहनांना 2 दिवस ‘नो एन्ट्री’; छटपूजेमुळे वाहतूकमार्गात केला बदल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उत्तर भारतीयांकडून पंचवटीतील रामतीर्थ परिसरात रविवारी (ता. १९) आणि सोमवारी (ता. २०) छटपूजा उत्‍सवाचे आयोजन केले आहे.

या भागात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्‍यामुळे पुढील दोन दिवस रामतीर्थ परिसरात वाहनांना नो एन्ट्री असणार आहे. (Traffic route has been changed due to Chhath Puja nashik news)

छटपूजेसाठी रामतीर्थ व गोदाकाठ परिसरात शहरातील विविध भागांतून उत्तर भारतीय दाखल होणार आहेत. त्‍यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. रहदारीची समस्‍या टाळण्यासाठी या मार्गावरून येणारी वाहने इतरत्र वळविण्यात आलेली आहेत.

पोलिसांनी जारी केलेल्‍या आदेशानुसार रविवारी आणि सोमवारी मालेगाव स्टॅण्ड सिग्नलपासून रामतीर्थाकडे जाणारा मार्ग, तसेच पंचवटी सार्वजनिक वाचनालय, खांदवे सभागृह, सरदार चौक, दिल्ली दरवाजा, गणेशवाडी या भागातून रामतीर्थाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने गणेशवाडी, काट्या मारुती पोलिस चौकी, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून वळविली आहे.

तसेच गोदाघाट, गाडगे महाराज पुलाखालील वाहनतळाची ठिकाणे निश्चित केली आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक बदलाबाबत सूचना जारी केल्‍या आहेत. वाहनचालकांनी बदललेल्या वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT