traffic rule penalty esakal
नाशिक

Traffic Rules Penalty : बेशिस्त वाहनचालकांकडून 10 कोटी 13 लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) बेशिस्त वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, एकूण ३५ हजार ८७७ वाहनांवर कारवाई करत सुमारे दहा कोटी १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली.

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत एकूण ३५ हजार ८७७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, रक्कम रुपये दहा कोटी १३ लाख एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. विहित वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिकने केली आहे. त्यामध्ये २०२१- २०२२ मध्ये एकूण (४,५९४) वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. (Traffic Rules Penalty 10 Crore 13 Lakhs fined from unruly drivers Nashik Latest Marathi News)

तर २०२२-२०२३ मधील (१ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ ) या सहा महिन्यांत सुमारे ११ हजार ५९१ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई नाशिक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. २०२१-२२ मध्ये एकूण तीन हजार ६२७ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आलेली होती. तर २०२२ -२०२३ या वर्षातील (१ एप्रिल २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ ) मध्ये एकूण ३,०४७ दुचाकीचालकांवर

कारवाई करण्यात आली आहे. तसेच, खासगी बस व अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात केलेल्या मोहिमेमध्ये एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये चार हजार १४३ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, यातील ७५६ दोषी वाहनांकडून दंड व कर स्वरूपात एकूण २० लाख ४८ हजार ९२५ रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT