MLA Dilip Borse inspecting the site of boating club and training center in Haranbari dam area.  
नाशिक

Nashik News: हरणबारी धरण परिसरात होणार बोटींग क्लबसह प्रशिक्षण केंद्र; मांगीतुंगी येथे हेलिपॅडसाठीही पाहणी

राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही पाहणी झाली असून पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांची लवकरच मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: हरणबारी (ता. बागलाण) येथील धरणक्षेत्रात होणाऱ्या बोटिंग क्लब व बोटिंग ट्रेनिंग सेंटर तसेच मांगीतुंगी येथील हेलिपॅड कामाच्या जागेची आमदार दिलीप बोरसे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही पाहणी झाली असून पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांची लवकरच मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. यामुळे पर्यटनास चालना मिळणार आहे. (Training Center with Boating Club to be established in Haranbari Dam area nashik news)

याबाबत आमदार बोरसे यांनी राज्य शासनास प्रस्ताव दाखल केला होता. शासनाने सकारात्मक पावले उचलली असून हरणबारी येथील बोटिंग क्लब व बोटिंग ट्रेनिंग सेंटरसाठी १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात येणार आहे. याठिकाणी पर्यटकांना बोटिंग करण्यासोबतच त्याबाबतचे प्रशिक्षणही उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे येथून जवळच असलेल्या प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे अत्याधुनिक हेलिपॅड तयार करण्यात येणार असून त्यासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

या हेलिपॅडची एअर कनेक्टिव्हिटी थेट मुंबई, दिल्ली, शिर्डी व तिरुपती बालाजीशी राहणार आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी निवास, मॉल व अन्य आनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

त्यामुळे संपूर्ण देशासह परदेशातील सर्वसामान्य व व्हीआयपी पर्यटक मांगीतुंगीशी आणि पर्यायाने तालुक्याशी जोडले जाणार आहेत. प्रत्येकी ५ एकर जागेवर विकसित होणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांमुळे बागलाण तालुका पर्यटनाच्या जागतिक नकाशावर ठळकपणे पुढे येणार आहे.

यामुळे तालुक्याच्या विकासालाही मोठा हातभार लागणार आहे. शासनाने अधिकाऱ्यांना सूचित करून आमदार बोरसे यांच्या समवेत जागेची पाहणी केली आणि तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. बागलाणचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार कैलास चावडे तसेच जलसंपदा व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार बोरसे यांच्या समवेत दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे. आमदार दिलीप बोरसे यांच्या पाठपुराव्याबाबत विशेष कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT