Batch of Agniveers esakal
नाशिक

Agniveer News: दुश्मनकी सेना देंगे चीर, हम है अग्निवीर! पहिल्या तुकडीला तोफखान्यात प्रशिक्षण

विनोद बेदरकर

नाशिक : हिंसक आंदोलनाने देशभर चर्चेत आलेल्या अग्निवीर भरती योजनेचा विरोध चव्हाट्यावर आला खरा, पण त्याच अग्निवीर योजनेत हजारो तरुण उत्स्फूर्त सहभागी होत असल्याचे दुसरे चित्र आहे.

एकट्या नाशिक रोड तोफखान्यात आतापर्यंत चार हजारांहून अधिक अग्निवीरांची भरती होऊन त्यांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील या एकमेव प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेल्या अग्निवीरांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक उच्चशिक्षित युवक आहेत हे विशेष! (Training of first batch of agniveer in artillery Agniveer News nashik news)

अग्निवीर

अग्निवीरअग्निवीर उपक्रमाला प्रखर विरोधासाठी हिंसक आंदोलनाचा धुरळा शांत झाला असताना, लष्कराकडून राज्यात नाशिक रोड तोफखान्यात पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. द्रोणाचार्य सभागृहापासून काही अंतरावर पूर्वी उपाहारगृह असलेल्या ठिकाणी अग्निवीरांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाला आहे.

तेथे नोंदणी, कागदपत्रांच्या तपासणी, बायोमेट्रीक औपचारिकेनंतर त्यांना १५ मिनिटांची चित्रफीत दाखविली जाते. त्यानंतर त्यांना त्यांच्या रेजिमेंटचे गणवेशासह इतर साहित्याचे किट दिले जाते. कर्नल निखिल. पी यांच्या देखरेखीखाली हा कक्ष कार्यरत आहे. त्यात, अग्निवीरांना भारतीय लष्कराचा तोफखान्याचा इतिहास समजून सांगितला जातो.

नाशिक रोडला चार हजारांहून अधिक अग्निवीर आतापर्यंत प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यात, ४० टक्क्यांहून अधिक पदवीधर आणि उच्चशिक्षित असल्याचे सांगण्यात आले. १७ ते २१ वयोगटातील युवकांसाठी असलेल्या या संधीत पहिल्या प्रयत्नात भारतीय लष्कराला उच्चशिक्षित युवक असल्याने पूर्वीपेक्षा अधिक शिक्षित अग्निवीर मिळणार आहे.

अग्निवीरांचे स्वागत

२१ आठवड्यांचे प्रशिक्षण

नव्याने भरती होणाऱ्या अग्निवीरांना २१ आठवड्यांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात पहिले दहा आठवडे सामान्य (बेसिक) आणि पुढील आठवडे ॲडव्हान्स प्रशिक्षणाची सोय आहे. पारंपरिक प्रशिक्षणात कपात न करता प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून सध्याचा प्रचलित अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार आहे.

त्यामुळे सैनिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही. तोफखान्यात अद्ययावत पध्दतीच्या प्रशिक्षणाची सोय आहे. विशेषतः तोफगोळे डागतांना ते अचूक ठिकाणी पडले का, यावर देखरेख ठेवण्यासाठी एक फळी असते. तोफखान्याच्या पुढच्या भागात आघाडीवर कार्यरत या फळीला संगणकीय सिम्युलेशन पद्धतीने भूमिगत सुरुंग आणि इतर अडथळ्यासह चढाईची दिशा योग्य मारा त्याची दिशा याचे प्रशिक्षण दिले जाईल.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

साधारण त्यात ४ ट्रेड आहेत. टेक्निकल अलिस्टेट, ऑपरेटर, चालक आणि गनर या प्रकारात कौशल्यानुरुप त्यांची रेजिमेंट ठरेल. सामुहीक ऑनलाइन परिक्षा होते. त्यातील गुण रेजिमेंट निवडीसाठी महत्त्वाची असेल. १० आठवड्यांत ८ किमी धावणे, पहिली थेट फायरिंग, संचलन, झिरोईंग, एमआर फायरिंग, ८ किमीपर्यंत शस्त्रसाहित्य घेउन धावण्याचे व फायरिंगचे प्रशिक्षण यांसह विविध दहा प्रकारच्या फायरिंग असे स्वरूप असेल. तर २१ आठवड्यांच्या प्रशिक्षणात तांत्रिक अद्यावतता, २४ किमीपर्यत धावणे, संचालन, तोफांचे फायरिंग यासह यासह ३० हून अधिक प्रकारचे कौशल्य शिकविली जाणार आहेत.

धुके घाट अन् जंगल

वाहनचालक घडविण्यासाठी भारत-स्वीडन संयुक्त निर्मित प्रशिक्षण सिम्युलेशन वाहन आहे. सुमारे दीड कोटीच्या या सिम्युलेशन यंत्रात वाहनाच्या केबिन बाहेरील स्क्रिनमुळे एकावेळी दाट धुके, गर्द वनराई आणि जंगलासह बर्फाळ डोंगरावर वाहन चालविण्याची अनुभव देणारे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते.

चारही बाजूने बंदीस्त स्वरुपातील या केबिनमध्ये बसल्यानंतर खड्यासह डोंगराळ आणि जंगलातून वाहन चालवीत असल्याचा अनुभव देत, उत्कृष्ट चालक घडविण्यासोबत अग्निविरांना प्रादेशिक परिवहन केंद्राकडून जागेवर परवाना देण्याची सोय आहे.

अग्निवीर नोंदणी कक्ष

अग्निवीरांसाठी दहा आदेश

- सदैव सत्य बोलेन, कारण सत्याचा विजय होतो

- सगळ्या जाती- धर्माचा सारखा सन्मान करेन

- वेळा पाळण्याबाबत मी कायम काटेकोर राहीन

- वरिष्ठांच्या जाचक आदेश काटेकोर पालन करीन

- शिस्त, वर्तनाबाबत तक्रारीची संधी देणार नाही

- राहण्याचे ठिकाण, शरीर स्वच्छतेबाबत दक्ष राहीन

- मी माझे मन आणि शरीर कायम मजबूत ठेवेन

- मानसिक विकासासाठी कायम प्रयत्नशील राहील

- मन लावून प्रशिक्षण पूर्ण करेन

- रेजिमेंट, लष्कराच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य

असा असेल गणवेश

अशी आहे प्रतिज्ञा

हे ईश्वर मुझे इतकी शक्ती देना कि मेरे मन का विश्वास कभी कमजोर न हो ! मुश्कील वक्त मे भी मै साहसी रचनामई, विश्वास और वफादारी के साथ नामर र्तपर्मिसा दस तप्रिके नाश नारिऔ कमन हू ! मै एक आदर्श सैनिक व अच्छा नागरिक बनकर सेना और अपने देश का गौरव बढाने मे पुरा योगदान देता रहू !

पंतप्रधानांचा संवाद

देशातील पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा प्रतिसाद बघता देशभरातील उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांचे आणि केंद्र शासनाचे येथील प्रशिक्षणाकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे कदाचित आठवडाभरात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्च पदस्थ संरक्षण विभागातील अधिकारी ऑनलाइन स्वरूपात अग्निवीरांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT