Police esakal
नाशिक

Nashik Police Transfer : नाशिक परिक्षेत्रातील 44 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत कार्यरत ४४ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील यांच्या आदेशान्वये सदरील बदल्या करण्यात आलेल्या आहेत. (Transfer of 44 police officers in Nashik area news)

नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यात कार्यरत पोलिस अधिकाऱ्यांना नवी पदस्थापना देण्यात आली आहे. ग्रामीण पोलिस दलातील बाराशेहून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. शहर पोलिस दलातील अंमलदार आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

आता परिक्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव नियमित व विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नाशिक ग्रामीणला ६ उपनिरीक्षक, २ सहायक निरीक्षक व ४ पोलिस निरीक्षक मिळाले आहेत. एकूण २६ पोलिस उपनिरीक्षकांची बदली परिक्षेत्रातील जिल्ह्यांत करण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (बदलीचे ठिकाण)

राजेंद्र भोसले (नाशिक ग्रामीण), रामराव ढिकले (नाशिक ग्रामीण), निवृत्ती पवार (धुळे), अनिल भवारी (जळगाव), नानासाहेब नागदरे (नंदूरबार), संजय सोनवणे (अहमदनगर), सुनील भाबड (नाशिक ग्रामीण), दिगंबर भदाणे (अहमदनगर), कैलास वाघ (नाशिक ग्रामीण).

सहायक निरीक्षक ः नरेंद्र साबळे (नाशिक ग्रामीण), सचिन कापडणीस (धुळे), विजय झंजाड (अहमदनगर), सुनील पाटील (नाशिक ग्रामीण)

पोलिस उपनिरीक्षक ः विजया पवार (नाशिक ग्रामीण), अशोक काळे (नाशिक ग्रामीण), अंकिता बाविस्कर (नाशिक ग्रामीण), अशोक मोकळ (नाशिक ग्रामीण), मुकेश पवार (नंदूरबार) यासह २६ उपनिरीक्षकांची बदली झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात,इस्राईलचा इशारा; लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची जुळवाजुळव

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

Latest Marathi News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या नेतृत्वात महत्वाची बैठक

IND vs BAN 1st Test : Ravindra Jadeja काल होत्या तेवढ्याच धावांवर बाद झाला; शतकाची थोडक्यात हुलकावणी

SCROLL FOR NEXT