Police Transfer esakal
नाशिक

Nashik Police: गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक ढमाळ यांची बदली! युनिट एकला शिंदे, युनिट दोनला माछरे यांची नियुक्ती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत.

यात पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. (Transfer of Police Inspector Dhumal of Crime Branch Unit One Appointment of Shinde to unit one Machine to unit two nashik news)

पोलीस महासंचालक कार्यालयाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के.एम. मल्लिकार्जून प्रसन्ना यांनी राज्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या विनंतीने पसंतीक्रमानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार, नाशिक पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ यांची पसंतीनुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झाली आहे. तसेच मुंबई शहरातील निरीक्षक अशोक घुगे यांची नाशिक ग्रामीणमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

ढमाळ यांनी नाशिक शहरात मुंबई नाका पोलिस ठाणे व गुन्हे शाखेत दमदार कामगिरी केली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

मुथ्थूट फायनान्स दरोडा, पारख अपहरण, एमडी प्रकरणातील संशयितांची धरपकड करून त्यांची पाळेमुळे शोधणे, खुन, घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी यासारख्या गुन्ह्यांचीही उकल त्यांनी केली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याचीही जबाबदारी त्यांनी यापूर्वी पार पाडलेली आहे.

शिंदे, माछरे यांची नियुक्ती

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विजय ढमाळ यांची बदली झाल्याने युनिट एकची जबाबदारी पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर युनिट दोनच्या पोलीस निरीक्षकपदी सोहन माछरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT