PI Transfers esakal
नाशिक

Nashik PI Transfer : नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांचा अखेर बदल्या; आगामी लोकसभा निवडणूक

एकाच जिल्ह्यात सलग तीन वर्ष व त्याहून अधिकचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या नाशिक परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी बदल्या केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik PI Transfer : एकाच जिल्ह्यात सलग तीन वर्ष व त्याहून अधिकचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या नाशिक परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी बदल्या केल्या आहेत. यात २२ नि:शस्त्र पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ()

येत्या काही महिन्यांवर आगामी लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेश व पोलिस महासंचालक कार्यालयाच्या सूचनेनुसार, नाशिक शहर व जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांसह परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित होण्यास प्रारंभ होत आहेत.

प्रामुख्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी २२ निरीक्षकांच्या परजिल्हा बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. यांसह शहरात ‘प्रभारी’ निरीक्षकांसह सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच विविध परिक्षेत्रातील जिल्हे व वेगवेगळ्या विभागांत बदल्या होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी नाशिकरोड विभागाचे सहायक आयुक्त आनंदा वाघ यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत बदली करण्यात आली. गृह विभागाने यासंदर्भातील आदेशही निर्गमित केले. तर नाशिक शहरातील तब्बल ८० हून अधिक अधिकाऱ्यांचीही माहिती मागविण्यात आली आहे. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

ज्या अधिकाऱ्यांची नाशिक संवर्गात तीन ते सहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झाली आहे. त्या अधिकाऱ्यांकडील अर्ज काही दिवसांपूर्वीच मागविण्यात आले आहेत. बदलीपूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमांचाही विचार होण्याची शक्यता आहे. मात्र, या बदल्यांमुळे नाशिक शहर आयुक्तालयाच्या पोलिस ठाण्यांसह विविध शाखा व पथकांच्याही पोलिस निरीक्षकांच्या जबाबदारीत बदल होण्याची शक्यता आहे.

आयुक्तालयातील यांच्या होणार बदल्या

शहर पोलिस आयुक्तालयातील तेरा पोलिस ठाण्यांपैकी भद्रकाली, अंबड, इंदिरानगर, उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी शहरात बदलून आलेले निरीक्षक ‘प्रभारी’ म्हणूण कार्यरत आहेत. तर म्हसरूळचे निरीक्षक राजू पाचोरकर, पंचवटीचे अनिल शिंदे, आडगावचे गणेश न्यायदे, गंगापूरचे श्रीकांत निंबाळकर, मुंबई नाक्याचे युवराज पत्की, सातपूरचे पंकज भालेराव, देवळाली कॅम्पचे प्रविण चव्हाण यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

नाशिक परिक्षेत्रातील बदल्या (कंसात कोठून - कुठे)

सुहास चव्हाण (अहमदनगर-नंदूरबार), घन:श्याम बळप (अहमदनगर-नाशिक ग्रामीण), मधुकर साळवे (अहमदनगर -जळगाव), हर्षवर्धन गवळी (अहमदनगर-धुळे), वासुदेव देसले (अहमदनगर -नंदूरबार), चंद्रशेखर यादव (अहमदनगर -धुळे), खगेंद्र टेंभेकर (नाशिक ग्रामीण -अहमदनगर), बाळासाहेब थोरात (नाशिक ग्रामीण - धुळे), संदीप कोळी (नाशिक ग्रामीण -अहमदनगर), समीर बारावकर (नाशिक ग्रामीण-अहमदनगर), संदीप रणदिवे (नाशिक ग्रामीण -जळगाव), समाधान नागरे (नाशिक ग्रामीण -अहमदनगर), रामकृष्ण कुंभार(जळगाव -अहमदनगर), अरुण धनवडे (जळगाव-नाशिक ग्रामीण), राहुल खताळ (जळगाव -नाशिक ग्रामीण), नितीन देशमुख (धुळे -अहमदनगर),

आनंद कोकरे (धुळे-अहमदनगर), सतीष घोटेकर (धुळे -अहमदनगर ), संजय सानप (अहमदनगर -नाशिक ग्रामीण), विलास पुजारी (अहमदनगर -नाशिक ग्रामीण), सोपान शिरसाठ (अहमदनगर-नाशिक ग्रामीण), शिवाजी डोईफोडे (अहमदनगर -नाशिक ग्रामीण), विकास देवरे (नाशिक ग्रामीण -जळगाव), अरविंद जोंधळे (नाशिक ग्रामीण - नंदूरबार), सुनिल पाटील (नाशिक ग्रामीण -जळगाव), साेपान काकड (नाशिक ग्रामीण -अहमदनगर), कांतीलाल पाटील (जळगाव-धुळे), राजेंद्र पाटील (जळगाव - नाशिक ग्रामीण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT