Girish Mahajan esakal
नाशिक

ZP Teacher Transfer : 'गिरीश महाजनांकडे विनंती पण..',शिक्षकांना या तारखेपर्यंत बदलीच्या ठिकाणी व्हावे लागणार हजर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची सध्या ऑनलाइन प्रक्रिया झाली आहे.

सर्वर्गनिहाय बदल्या झाल्या असून, जिल्ह्यातील सुमारे एक हजार ६५७ प्राथमिक शिक्षकांना बदली आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आले. या शिक्षकांना संबंधित शाळेत ३१ मेपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Transfer orders to 1 thousand 657 teachers of Zilla Parishad nashik news)

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पार पडली. जानेवारीत बदल्यांचा शेवटचा टप्पा संपला. यात नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एक हजार ९२८ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत.

त्यांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. त्यात संवर्ग एकमधील ३४८ शिक्षक, संवर्ग दोनमधील २०१, संवर्ग तीनमधील २२३, संवर्ग चार बदलीपात्र मधील ७९७, संवर्ग पाच विस्थापीतमधील सहा, तर संवर्ग सहा अवघड क्षेत्रातील ३२७ शिक्षकांचा यात समावेश आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असल्याने बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले.

परीक्षा संपल्यानंतर कालावधी उलटूनही बरेच दिवस झाले तरी बदली शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून बदली आदेश मिळालेले नाहीत. शेवटी शासनाने शिक्षकांना बदली आदेश देण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ६५७ प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून बदली आदेश देण्यात आले आहेत. बदली आदेश मिळाल्यानंतर शिक्षकांनी ३१ मेपर्यंत बदली झालेल्या शाळेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिक्षकांना ३१ मेपर्यंत बदली झालेल्या ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे.

‘तो’ २७० शिक्षक तूर्त कार्यमुक्त नाही

बदली प्रक्रियेत पात्र नसतानाही सर्वसाधारण क्षेत्रातून ३२७ शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदली करण्यात आली. या बदल्यांना शिक्षकांनी विरोध दर्शवत, बदल्या नको, असे साकडे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना घातले होते. बदली झालेल्या ३२७ शिक्षकांपैकी २७० शिक्षकांनी या विरोधात न्यायालयात दाद मागितली.

यावर गेल्या काही दिवसांपासून न्यायालयात सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. यात, जिल्हांतर्गत बदल्यांमधील ज्या शिक्षकांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्या शिक्षकांना सध्या तरी कार्यमुक्त करू नये, असे आदेश ग्रामविकास विभागाने बजाविले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेमधील अवघड क्षेत्रातील २७० शिक्षकांना कार्यमुक्त करता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT