सिडको (जि. नाशिक) : नाशिक सिडको प्रशासक यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्याने सिडको कार्यालयात केवळ चार कर्मचारी नागरिकांच्या कामासाठी उपलब्ध राहणार आहेत. सदर कर्मचारी संख्या वाढवून प्रशासक सप्ताहमध्ये किमान तीन दिवस नाशिक सिडको कार्यालयात उपलब्ध राहावेत, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Transfers of 8 employees including CIDCO administrators Nashik news)
पत्रकात म्हटले आहे, की सिडको कार्यालय येथील कर्मचारी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे समजते. त्याअनुषंगाने नाशिक सिडको कार्यालयातील लिपिक यांची सीबीडी बेलापूर या ठिकाणी बदली केली आहे व नाशिक सिडको कार्यालयाला दोन लिपिक, एक शिपाई, एक लेखा विभागातील कर्मचारी असे कर्मचारी ठेवण्यात आलेले आहे. दैनंदिन काम बघता शेकडो नागरिक दर दिवशी प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात येत असतात.
त्यामुळे नागरिकांची संख्या बघता कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. याचा त्रास नागरिकांना होणार आहे. नाशिकमध्ये सिडकोच्या एक ते सहा योजना असून, १२ सेक्टर आहेत. त्यामुळे कमीत- कमी ५ लिपिकांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे प्रशासकपदाचा कार्यभार संभाजीनगर येथील प्रशासक यांच्याकडे दिलेला असून, प्रशासक यांनी सुद्धा सप्ताहात किमान तीन दिवस हजर राहणे आवश्यक आहे.
"सिडको प्रशासनाने नाशिक सिडको कार्यालयाच्या प्रशासकविना काढलेला आदेश सिडको मिळकत धारकांवर अन्यायकारक आहे. सिडको कार्यालय औरंगाबाद कार्यालयाला जोडल्यामुळे वेळ आणि जादा खर्च करावा लागणार आहे. हा आदेश रद्द करून प्रशासकसह नवीन आदेश काढावा अन्यथा आंदोलन करावे लागेल."
- तानाजी जायभावे, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.