Fake Doctors esakal
नाशिक

Nashik Fake Doctor : वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर उपचार; बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना अॅलोपॅथी औषधांच्या आधारे प्रॅक्टिस करत असलेल्या बोगस डॉक्टरचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पदाफार्श केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fake Doctor : जिल्ह्यात वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना अॅलोपॅथी औषधांच्या आधारे प्रॅक्टिस करत असलेल्या बोगस डॉक्टरचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पदाफार्श केला आहे.

पश्चिम बंगाल येथील फूलतला तालुका जिल्हा चोवीस परगणा येथील रहिवासी इसम वैद्यकीय पदवी नसतांना डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत असल्याचे आरोग्य विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Treatment of patients without medical certificate nashik fake doctor news)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांना सुरगाणा येथील ग्रामपंचायत बाऱ्हे येथे एक व्यक्ती कुठलीही वैद्यकीय पदवी नसतांना डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत असल्याची गोपनीय माहिती दिली होती. त्याअनुषंगाने मित्तल यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना सदर प्रकरणी शहानिशा करून कारवाई करावी, असे निर्देश दिले होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांना सुरगाणा येथील प्रकाराबाबत चौकशी पथक पाठविण्याच्या सूचना केल्या.

या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर यांच्यासमवेत डॉ. देवानंद चौधरी, डॉ. अक्षय पाटील, औषध निर्माण अधिकारी तुषार चौधरी, आरोग्य सेवक कपिल जाधव यांच्या चौकशी पथकाने पंचासमवेत बाऱ्हे फाटा येथे रोड लगत पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम हा खुर्चीवर बसलेला दिसला.

त्याची चौकशी केली असता सदर इसमाने स्वतःचे नाव दीपक ज्योतीन ओझा (वय ३८) असे सांगितले. सदर इसम तो पश्चिम बंगाल येथील फूलतला तालुका जिल्हा चोवीस परगणा येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. टेबलवर १८ प्रकारचे ११ हजार ५३४ रुपये किमतीची वैद्यकीय औषधे हस्तगत करण्यात आली. त्याच्याविरूद्ध बाऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT