Uprooted tree fallen in Sivaganga Society. esakal
नाशिक

नाशिक : सिडकोत वृक्ष कोसळला; थोडक्यात वाचली स्कुल व्हॅन

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : येथील शुभम पार्क परिसरातील चर्चसमोरील शिवगंगा सोसायटीमधील भला मोठा वृक्ष मुळासह शुक्रवारी (ता. १२) दुपारी बाराच्या सुमारास उन्मळून पडला. काही सेकंद आधी तेथून एक स्कूल व्हॅन गेली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

याच ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत उभे असणारे माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अनर्थ घडला असता, तर त्याला महापालिकेचे प्रशासन जबाबदार राहिले असते, असा आरोप त्यांनी केला. (tree fallen Latest cidco nashik Marathi News)

या भागात पाच ते सात मोठी वृक्षे आहेत. येथील नागरिकांची या वृक्षांचा विस्तार कमी करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. त्या दृष्टीने श्री. सूर्यवंशी यांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे मागणी केली. पत्रव्यवहार केला. मात्र, या भागातील पर्यावरणप्रेमींकडून नेहमीच त्याला हरकत घेतली जाते.

परिणामी, ही झाडे अस्ताव्यस्त पद्धतीने वाढली आहेत. शुक्रवारी (ता. १२) दुपारी अचानक हे झाड कोसळले. या वेळी स्कूल व्हॅन येथून पुढे जाऊन अवघ्या काही मीटर अंतरावर होती. त्याच वेळेस समोरून जाणारी एक महिलाही सदैवाने वाचली.

संबंधित विभागाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या झाडांचा विस्तार कमी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना येथे बोलावण्यात आले. त्यांनी करवत आदी साहित्याने झाडाच्या फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

"अनेकदा महापालिका प्रशासनाला याबाबत कळविल्यानंतरही कोणतीही कार्यवाही होत नाही. हे संतापजनक आहे. दुर्दैवाने येथे जीवितहानी झाली, तर त्याला महापालिका प्रशासन जबाबदार असेल. तातडीने या वृक्षांच्या फांद्या छाटल्या नाहीत, तर स्थानिक रहिवाशांसोबत तीव्र आंदोलन छेडले जाईल." -डी. जी. सूर्यवंशी, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT