घोटी (जि. नाशिक) : शासनाच्या वृक्ष संवर्धनच्या'झाडे लावा झाडे जगवा' मोहिमेंतर्गंत दरवर्षी गाव शिवारासह वनविभागाच्या डोंगर परिसरात वृक्ष लागवड मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. रोपांऐवजी फांदी लागवड केल्यास कमी वेळात डेरेदार वृक्ष निर्माण होऊन निसर्ग संवर्धन जोमात होऊ शकेल याकडे शासनाने लक्ष देणे काळाची गरज असल्याचे मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केले आहे. तालुक्यात जागोजागी लावण्यात आलेल्या रोपांची दुरवस्था मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. तालुकाभर हजारो झाडे लावली असली तरी प्रत्यक्षात मात्र बोटावर मोजण्याइतकी झाडे तग धरलेली दिसून येत आहे.
शासनाने मोठा गाजावाजा करीत जुलै महिन्यात वृक्ष संवर्धन ज्या पद्धतीने राबविले, त्यामानाने रोपांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. गॅस दर वाढल्याने व खऱ्याखुऱ्या आदिवासी लाभार्थीनी डावलल्याने त्यात आदिवासी जंगल परिसरात प्रधानमंत्री उज्जवल योजना फसल्याने व खासगी बिल्डर लॉबीने भुईसपाट केलेले डोंगरावरील वाढत्या वृक्षतोडीने जंगलाचे क्षेत्र कमी झाले आहे. यासर्व बाबींचा परिणाम वृक्ष संवर्धनावर होत आहे.
दरवर्षी जुलैमध्ये शासनाच्या विविध विभागांसह वनविभागातर्फे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येतो. विविध शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये व सामाजिक वनीकरण विभागातर्फे रस्त्यांलगत वृक्ष लागवड मोहिमेंतर्गंत रोपे लावण्यात आली, मात्र पाण्याअभावी लावण्यात आलेली रोपे नष्ट झाली. टाके-घोटी, न्हाईडी डोंगर घोटी, टाकेद परिसर, आवळखेड, त्रिंगलवाडी, खैरगाव, कुरुंगवाडी, भावली, धारगाव, वैतरणा आदी डोंगर परिसरात हजारो रोपांची लागवड करण्यात आली.
मात्र लागवडीनंतर अवघ्या काही दिवसातच लागवड केलेल्या रोपांची अत्यंत विदारक अवस्था दिसून आली. सद्यस्थितीत परिसरात बोटावर मोजण्यात इतकेच रोपे तग धरून उभी आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षांना पाणी पुरविल्यास व जास्तीत जास्त रोपांची संख्या कमी करत फांदी लागवडीवर भर दिल्यास चार महिन्यातच वृक्ष डेरेदार होण्यास मदत होईल, फांदी लागवडीत जितके मोठी फांदी तितकेच मोठे वृक्ष निर्माण होते. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
"रोपांना सातत्याने पाणी पुरवठा व इतर जोखीम असल्याने वृक्ष वाढीसाठी फांदी लागवड यशस्वीपणे राबवता येऊ शकते. यासाठी प्रशासन, वनविभागाने अधिक लक्ष द्यावे."
- राजू सुराणा, पर्यावरण प्रेमी, घोटी.
"रोपांना वाढीसाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो, निसर्गाने आपल्याला आपल्याकडे असलेल्या झाडांच्या अतिरिक्त फांद्या तोडून त्यांचे पुनर्वसन केल्यास कमी कालावधीत परिसरात हिरवळ दाटू शकते."
- विनायक शिरसाठ, पर्यावरण प्रेमी, कावनई.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.