नाशिक : शहराच्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेला बळ देणारी शहर बससेवेचा पहिल्या दिवसाचा ट्रायल रन बुधवारी (ता. ३०) यशस्वी पार पडला. गोल्फ क्लब मैदानावरील कमांड कंट्रोल सेंटरमध्ये बस लोकेशनचे सिग्नल मिळण्यापासून ते संगणकीकृत तिकिटांची नोंद झाल्याने तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या. (trial run of Nashik city bus service was successful)
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहर बससेवा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पन्नास बस चालविल्या जाणार आहेत. एकदा बस रस्त्यावर उतरविल्यानंतर पुन्हा सेवा बंद करता येणार नसल्याने महापालिकेकडून आजपासून ट्रायल रन सुरू केला. तपोवन डेपोतून पाच, तर नाशिक रोड बस डेपोतून चार, अशा नऊ बस सकाळी साडेआठपासून रस्त्यावर उतरविण्यात आल्या. तपोवन डेपोतून बारदान फाटा मार्गे सीबीएस, सिव्हिल हॉस्पिटल, सातपूर, अशोकनगर. तपोवन ते सिम्बॉयसिस कॉलेजमार्गे, सीबीएस, सिव्हिल, पवननगर, उत्तमनगर. तपोवन ते पाथर्डी गावमार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव, सिम्बॉयसिस कॉलेज ते बोरगडमार्गे शिवाजी चौक, लेखानगर, महामार्ग, म्हसरूळ, तसेच तपोवन ते भगूरमार्गे द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प याप्रमाणे बस सोडण्यात आल्या. नाशिक रोड डेपोतून नाशिक रोड ते बारदान फाटामार्गे द्वारका, कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नाका. नाशिक रोड ते अंबड गावमार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे पॉइंट, नाशिक रोड ते निमाणीमार्गे, जेल टाकी, सैलानी बाबा, नांदूरगाव, नांदूर नाका, तपोवन, नाशिक रोड ते तपोवनमार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी याप्रमाणे नऊ मार्गांवर बस धावल्या. सायंकाळी सहापर्यंत बससाठी उपलब्ध केलेल्या संगणकीय प्रणालीची चाचणी घेण्यात आली.
दोनशेहून अधिक थांब्यांवर थांबली बस
नियमित बससेवा ज्याप्रमाणे चालते त्याप्रमाणे ट्रायल रन झाला. या दरम्यान नऊ मार्गांवरील सुमारे दोनशेहून अधिक थांब्यांवर बस थांबवून प्रवाशांना बसविण्यात आले. इलेक्ट्रॉनिक तिकीट, बस स्थानकासंदर्भातील अनाऊन्स सिस्टिम, बसचे ग्लोबल पोजिसिंग सिस्टिमद्वारे लोकेशन (जीपीएस), सीसीटीव्ही आदी बाबी तपासण्यात आल्या. गोल्फ क्लब मैदानावरील कमांड कंट्रोल सेंटरमध्ये सिग्नल प्राप्त झाल्याने ट्रायल रन यशस्वी झाल्याचा दावा बस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला.
उद्या संगणकीय सेवांचे उद्घाटन
बससेवेचे मुख्य उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन नंतर होणार आहे. त्यापूर्वी सेवा सुरू होण्यासाठी आवश्यक असलेल्या संगणकीय सेवांचे उद्घाटन गुरुवारी (ता. १) करण्याची तयारी नाशिक महानगर परिवहन कंपनीकडून करण्यात आली आहे. (trial run of Nashik city bus service was successful)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.