ashram school file photo esakal
नाशिक

Tribal Ashram School: नवीन वेळापत्रकानुसारच आश्रमशाळा सुरू राहणार

सकाळ वृत्तसेवा

Tribal Ashram School : आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या वेळेत राज्य शासनाने केलेल्या बदलास शिक्षकांकडून विरोध होत असला, तरी या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिवेशनात या विषयावर चर्चा वा विषयही उपस्थित झाला नाही. त्यामुळे बदललेल्या नवीन वेळापत्रकानुसारच राज्यातील आश्रमशाळा सुरू राहणार आहेत. (Tribal ashram schools will continue as per new schedule nashik)

गत महिन्यात आदिवासी आश्रमशाळांचे नवीन वार्षिक वेळापत्रकात उपसचिव वि. फ. वसावे यांनी काढले होते. त्यानुसार सकाळी पावणेनऊ ते दुपारी चारपर्यंत शाळेची वेळ केली. या निर्णयाची अंमलबजावणी १० जुलैपासून झालीही आहे.

मात्र, या निर्णयास आश्रमशाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांनी विरोध करीत पूर्वीप्रमाणेच आश्रमशाळेची वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी पाच अशी करावी, अशी जोरदार मागणी करीत काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले होते.

याबाबत, शिक्षक संघटनांनी आदिवासी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. बदललेली वेळ ही आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची असून, यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढणार असल्याचा दावा केला होता.

सकाळी पावणेनऊची वेळ असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठावे लागणार असल्याने त्याच्या झोपेवर परिणाम होईल. याशिवाय, सायंकाळी थकवा निर्माण होऊन त्यांचा वेळ अभ्यासात जाणार असल्याने त्यांना पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे संघटनांकडून सांगितले जात होते.

आयुक्तालयाकडून शासनाला शिक्षक संघटनांच्या भावना कळविण्यात आलेल्या आहेत. मात्र, निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आदिवासी विकासमंत्री आग्रही

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९९ शासकीय व ५४६ अनुदानित आश्रमशाळा असून, सुमारे साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या विद्यार्थ्यांना सायंकाळचा वेळ खेळ आणि स्वयंअध्ययनासाठी मिळावा, अशी मागणी मंथन गटाच्या बैठकीत करण्यात आली होती.

त्यानुसार अंतिम वेळापत्रक निश्चित करण्याचे निर्देश मंथन गटाच्या बैठकीत देण्यात आले होते. आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित हेही बदललेल्या वेळपत्रकाच्या बाजूने असल्याने शिक्षकांचा विरोध मावळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT