Tribal family Making Kochari esakal
नाशिक

कैरीपासून कोचरी बनविण्यासाठी आदिवासींची लगबग

सकाळ वृत्तसेवा

साल्हेर (जि. नाशिक) : बागलाणच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील साकोडे, केळझर, ततानी, बारीपाडा, साळवण, सावरपाडा, भाटांबा, बंधारपाडा, पायरपाडा, भिकारसौडा, महादर, मोठे, महादर, मानुर, बिंद्रावन, मोराळा, साल्हेर या भागात आंब्यांना (Mangoes) मोठ्या प्रमाणात बहर आलेला आहे. मात्र, दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे कैरी (Raw mangoes) पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पडलेल्या कैऱ्या वेचण्यासाठी आदिवासी (tribals) बांधवांची लगबग सुरू असून, त्यापासून कोचर बनविण्याला प्राधान्य दिले जात आहे. (tribal community excited to make kachori from Raw Mango Nashik News)

आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. यंदा आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, महिन्यापूर्वी बेमोसमी पावसामुळे मोहराची गळ होऊन नुकसान झाले. या नुकसानीनंतरही आंब्याचा बहार चांगला आलेला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या कैऱ्या गोळा करण्यासाठी महिला, पुरुषांसह लहान मुले धावपळ करत आहे. कैऱ्या घरी आणल्यानंतर कुटुंब एकत्र बसून कैरीवरील संपूर्ण साल काढून खापा केल्या जातात. खापा उन्हामध्ये सुकविल्यानंतर त्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतात. त्या माध्यमातून बाजारपेठेत कच्च्या कैरीच्या कोचरीला चांगला भाव मिळतो.

"आदिवासी भागात यंदा आंब्याचे उत्पन्न चांगले असल्यामुळे आंब्याची चव चाखण्यासाठी या भागातील बांधव आतुर होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या पडत असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याची चव घेण्यापासून यंदा आमच्या भागाला वंचित राहण्याची वेळ आली आहे." - अशोक शिंदे, आदिवासी शेतकरी, पायरपाडा

"कैरीपासून तयार केलेली कोचरी पूर्ण वाळलेली असल्यास तिला चांगला दर मिळतो. सध्या ही कोचरी घेण्यासाठी बाहेरून व्यापारी मोठ्या प्रमाणात गाव- पाड्यांवर फिरत आहे. जागेवर शंभर रुपये दर दिला जातो. त्यामुळे सध्यातरी आदिवासी बांधव कैरीपासून कोचरी बनवित आहे. त्यापासून लोणचे तयार केले जाते." - भूषण जाधव, शेतकरी, निकवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT