नाशिक : पारंपारिक आदिवासी लोकजीवनातील कला जोपासत आहेत, मूर्तिकार चंदर काकड. मूर्तींमधून आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा त्यांचा मानस आहे. फणसपाडा (ता. पेठ) येथे छोट्या घरात सुंदर मूर्तींना साठीच्या घरातील वयातही ते आकार देताहेत. छायाचित्र पुढे ठेवत त्याच्या आधारे ते हुबेहूब मूर्ती साकारतात. (Tribal Culture Sculpture chandar Kakad intention to show culture of tribals through idols nashik news)
श्री. काकड हे २५ वर्षांपासून ते मूर्ती साकारतात. नाशिकमधील मूर्तिकार मदन गर्गे यांच्याकडे ते कामास होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मातीला आकार देण्याची कला श्री. काकड यांनी अवगत केली. मोठ्या आकाराच्या मूर्ती साकारल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राघोजी भांगरे, लातूर येथे राजमुद्रा, पुण्यातील शक्ती-भक्ती आदींचा उल्लेख ते आवर्जून करतात. विविध जातीच्या पक्षी त्यांनी मातीमधून साकारलेत.
मुळातच, आदिवासी महिलांच्या जात्यावरची ओवी-गीते, कांडप गीते, बाळाला जोजवण्याची गीते अथवा सणासुदीची क्रीडा नृत्ये व तत्समबद्ध गीते, उत्सवातील नृत्य नाट्ये, देवतांच्या उपासना म्हणून केले जाणारे विधी-विधाने, विधीचा भाग म्हणून काढली जाणारी चित्रे, घडवली जाणारी शिल्पे, रांगोळ्या, मूर्ती या सर्व कला पारंपरिक लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
आदिवासी भागात धार्मिक कल्पनांशी निगडित अशी खूप सुशोभित नमुन्यांची भिंती चित्रे आदिवासी महिला सणासुदीच्या निमित्ताने साकारतात. या चित्रांतून परिसरातील पशू-पक्षी, वृक्ष-वेली, नदी-नाले, पर्वत, जंगल, नृत्ये, यात्रा, शेतीचा हंगाम, निसर्ग, घरे आदी असतात. भित्तीचित्रांच्या कलावंतांना व्यासपीठ मिळत नसल्याने भित्तिचित्रे कमी होत असल्याची खंत श्री. काकड व्यक्त करतात.
"मूर्तिकार मदन गर्गे यांच्याकडे पंचवीस वर्षांपासून शिल्प घडवण्याचे काम केले. आता पाड्यावर राहून आदिवासी संस्कृती आणि आदिवासी क्रांतिकारकांची शिल्पे बनवण्याची इच्छा आहे. अर्थात, त्यासाठी आर्थिक साहाय्य अन मार्गदर्शनाची गरज आहे."- चंदर काकड, मूर्तिकार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.