Department of Tribal Development esakal
नाशिक

Nashik News : कला, क्रीडाशिक्षक नियुक्तीबाबत आदिवासी विभागाचे अधिकारी संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील ८३६ कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांनी पुनर्नियुक्तीसाठी आयुक्तालयावर ठिय्या आंदोलन करत अल्टिमेटम दिला आहे. याप्रश्नी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनीही लक्ष घातले.

मात्र, न्यायालयाच्या आदेशामुळे या प्रश्नांवर विभागच संभ्रमात असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. १६) न्यायालयात याच प्रश्नाबाबत सुनावणी होत आहे, यात काय निर्णय होतो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. (Tribal department officials are confused about appointment of art sports teachers nashik news)

राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ४९७ शासकीय आश्रमशाळा असून, त्या ठिकाणी २०१८ मध्ये ३४० क्रीडाशिक्षकांची, तर २०१९ मध्ये २६० कला आणि २३६ संगणक शिक्षकांची ३३ महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली होती.

अपवाद धुळे, राजूर, घोडेगाव, मुंबई, वर्धा, भंडारा, देवरी आदी प्रकल्पांतील आश्रमशाळांचा होता. यातच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून बाह्यस्त्रोताद्वारे ही पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने संबंधित शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.

याचदरम्यान संबंधित शिक्षकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठाविला. यात न्यायालयाने स्थगिती देत त्यांना नियमित करा तसेच पुनर्नियुक्ती करू नका, असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने जुन्या शिक्षकांना नियमित करतानाच पुनर्नियुक्तीबाबत स्पष्ट आदेश न दिल्याने आदिवासी विकास विभाग संभ्रमात पडला आहे. नियुक्तीसाठी शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करत आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांना साकडे घातले.

त्यावर डॉ. गावित यांनी विभागाच्या सचिवांना बोलावून घेत नियुक्तीचे आदेश द्यावे, अशा सूचना केल्या. मात्र, त्यानंतर विभागांतर्गत चर्चा झाली. यात नेमके काय करावे, याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. यामुळे या अधिकाऱ्यांनी सुनावणी होईपर्यंत ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीबाबतचा गुंता कायम आहे.

"कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीबाबत न्यायालयाचे स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता. १६) यावर सुनावणी होत आहे. यात न्यायालयाचा काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुनर्नियुक्तीबाबत पुढील कारवाई करण्यात येईल." - डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी विकासमंत्री, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT