The dam, which is a tourist attraction in the taluk, has started overflowing on Monday (31st).  esakal
नाशिक

Nashik Tringalwadi Dam : त्रिंगलवाडीचे धरणही भरले 100 टक्के; पावसाळी पर्यटकांची वाढली वर्दळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tringalwadi Dam : इगतपुरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा व राज्यभरातील तमाम हौशी पर्यटकांचे आकर्षण असणारे व ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे त्रिंगलवाडी धरण आज पूर्ण क्षमतेने भरूनओसंडून वाहू लागले आहे.

पंचक्रोशीतील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासह शेतीची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणारे हे धरण असल्याने अवघी त्रिंगलवाडीची पंचक्रोशी सुखावली आहे. (Tringalwadi dam is 100 percent fully nashik news)

दरम्यान तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून होत असलेल्या संततधारेमुळे तालुक्यातील सर्व धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. महत्वाचे समजले जाणारे दारणा धरणही भरण्याच्या मार्गावर आले आहे.

तालुक्यात मागील दहा दिवसापासून सुरु झालेल्या पावसाने अद्यापही इगतपुरी तालुक्यात उसंत दिलेली नाही. सर्वत्र समाधानकारक होणाऱ्या पावसाने तालुक्यातील धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुक्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीची ६५ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. यावर्षी पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज (ता. ३१) पर्यंत एकूण २ हजार ०६३ मिलीमीटर पाऊस झाल्याने तालुक्यातील धरणसाठ्यात भरमसाठ वाढ झाली आहे.

ऑगस्टमधील परंपरा कायम

गेल्या वर्षी हे धरण १ ऑगष्टलाच भरले होते. यंदा उशिराने पाऊस सुरु होऊनही धरण लवकर भरल्याची किमया वरुणराजाने साधली आहे. यावरून या भागात पावसाचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो. आता या भागातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मात्र रोजच गर्दी होतांना दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT