मनमाड (जि.नाशिक) : दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग तसा कुणाच्याही नशिबी येत नाही. पण मनमाडमधील मृत मातेच्या नशिबात हा योग आला. कोरोना काळात मृत आईचा दफन केलेला देह आम्हाला मिळावा, तो आमच्या गावी आम्ही दफन करू, यासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजवणारी मुले एकीकडे आईसाठी व्याकुळ होतात. तर दुसरीकडे आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडून जबाबदारी झटकणारी मुले कृतघ्न झालेली दिसतात. अगदी ऊर भरून यावा, अशी ही घटना मनमाडला घडली आहे.
अगदी ऊर भरून यावा, अशी घटना मनमाडला घडली
कोरोना काळात मनमाड येथील मंजुलता वसंतराव क्षीरसागर यांना हृदयविकारामुळे छातीत दुखू लागल्याने त्यांना मनमाडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून त्यांना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले तेथे न्यूमोनियाचे निदान करून त्यांची २२ सप्टेंबरला कोरोना टेस्ट करून संशयित रुग्ण सहारा कोविड सेंटरमध्ये दाखल केला. मात्र त्याच सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. आईचे निधन झाल्याने दोन्ही मुले शोकसागरात बुडाली. कोरोना रिपोर्ट यायचा बाकी होता. आईचा अंत्यविधी मनमाडला करतो. म्हणून प्रशासन अधिकाऱ्यांच्या विनवण्या केल्या. मात्र रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे संशयित असल्याने अधिकाऱ्यांनी सफशेल नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी २३ सप्टेंबरला ख्रिस्ती धर्म परंपरेनुसार संत पॉल चर्चच्या नामपूर रोड, मालेगाव कॅम्प येथील कब्रस्तानात दफनविधी झाला.
मुलांचे अंतःकरण व्याकुळ
तिसऱ्या दिवशी (ता. २४) रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे आता काय करायचे, आईचा दफनविधी तर झाला, या पेचात मुलगा सुहास आणि संदीप पडले.
आपली आई आपल्या जवळच पाहिजे, या भावनेमुळे मुलांचे अंतःकरण व्याकुळ झाले. त्यामुळे मुलांनी आईचा कब्रस्तानातील मृतदेह मिळावा म्हणून मालेगाव महापालिकेकडे अर्ज केला. अर्ज पाहून प्रशासनही चक्रावले. महिनाभर विविध कार्यालयांच्या पायऱ्या झिजवल्या. हो- नाही करत शासकीय आणि धार्मिक सर्वच पूर्तता केली. अखेर आईवरील मुलांचे प्रेम पाहून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर मृतदेह स्थलांतराची परवानगी दिली. आई गेल्याचे दुःख आणि आई जवळ आल्याचा आंनद अशी द्विधास्थिती मुलांमध्ये होती.
मृत आईची मुलांशी झालेली ताटातूट पुन्हा जुळली
गुरुवारी (ता.१७) सकाळी आठला मालेगावच्या कब्रस्तानातून पोलिस, शासकीय अधिकारी, ख्रिस्ती धर्ममंडळी, पंचांच्या समक्ष मंजूलताबाईंची दफन केलेली मृतदेहाची शवपेटी विधिवत काढली. तेथून शवपेटी मोटारीने मनमाडला आल्यानंतर येथील ख्रिस्ती कब्रस्तानात विधिवत त्याच उपस्थित मंडळींच्या समक्ष पुन्हा दफन केले. मृत आईची मुलांशी झालेली
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.